संपुर्ण नाव- अमय रामसेवक खुरेसिया
जन्मतारिख- 18 मे, 1972
जन्मस्थळ- जबलपूर, मध्य प्रदेश
मुख्य संघ- भारत आणि मध्य प्रदेश
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज (फिरकीपटू)
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 30 मार्च, 1999
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 12, धावा- 149, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-अमय खुरेसिया हे भारतीय सीमाशुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात निरिक्षक होते.
-1989-90 साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे खुरेसिया यांनी काही वेळातच चांगले नाव कमावले.
-1992-93 साली मध्य प्रदेशकडून खेळताना खुरेसिया यांनी सर्वोत्कृष्ट 238 धावा करत विक्रम नोंदवला होता.
-त्यांनी प्रथम श्रेणीत 41च्या सरासरीने 7304 धावा केल्या होत्या. यातील 5745 धावा त्यांनी मध्य प्रदेशकडून खेळताना केल्या होत्या. पुढे मध्य प्रदेशकडून खेळताना त्यांच्या या धावांचा पल्ला देवेंद्र बुंदेला आणि नमन ओझा यांनी गाठला.
-त्यांच्या प्रथम श्रेणीतील कामगिरीने त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची दारे खुली केली होती. 1999 साली वनडेत पदार्पण करत खुरेसिया यांनी श्रीलंकाविरुद्ध 25 धावा केल्या होत्या.
-त्यानंत पुढे त्यांना विशेष प्रदर्शन करता आले नव्हते. तरीही त्यांची 1999च्या विश्वचषकात निवड झाली होती. यावेळी त्यांनी केवळ 1 सामना खेळला होता.
-क्रिकेमधील निवृत्तीनंतर खुरेसिया हे टीव्ही समालोचक बनले.