संपुर्ण नाव- अशोक विनू मंकड
जन्मतारिख- 12 ऑक्टोबर, 1946
जन्मस्थळ- बॉम्बे (आताची मुंबई), महाराष्ट्र
मृत्यू- 1 ऑगस्ट, 2008
मुख्य संघ- भारत आणि मुंबई
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 25 ते 30 सप्टेंबर, 1969
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 15 ते 16 जुलै, 1974
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 22, धावा- 991, शतके- 0
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 44, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 1, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/47
थोडक्यात माहिती-
-अशोक मंकड यांना ‘काका’ हे टोपणनाव पडले होते. कारण, मंकड हे अभिनेता राजेश खन्नाचे चाहते होते, ज्यांना ‘काका’ या नावाने ओळखले जाते.
-मंकड यांचे वडील विनू मंकड हे उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटू होते. त्यांची प्रथम श्रेणी सामन्यातील कामगिरी उल्लेखनीय होती. त्यांनी 233 प्रथम श्रेणी सामन्यात 11591 धावा केल्या होत्या. ज्यात 26 शतकांचा आणि 52 अर्धशतकांचा समावेश होता. शिवाय त्यांनी प्रथम श्रेणी कारकिर्दीत 782 विकेट्स घेतल्या होत्या.
-त्यांचे भाऊ राहूल मंकड आणि अतुल मंकड यांनीही प्रथम श्रेणी सामने खेळले होते.
-केवळ वडिल आणि भाऊ यांनी क्रिकेट क्षेत्रात कामगिरी केलेली नाही. तर, मंकड यांची पत्नी आणि मुलांनीही क्रिडा क्षेत्रात कामगिरी केली आहे.
-मंकड यांनी आशियाई टेनिस चॅम्पियन निरुपमा वसंत यांच्याशी लग्न केले. त्यांनी विम्बेलडन टेनिस स्पर्धेमध्येही सहभाग घेतला होता. त्यांचा मुलगा मिहीर आणि हर्ष हे दोघेही टेनिसपटू आहेत. त्यांनी डेविस कप स्पर्धेमध्येही टेनिस खेळले आहे.
-1963-64 साली युवा वयात एमसीसी स्पर्धेमध्ये त्यांनी क्रिकेट कारकिर्दीतील पहिले अर्धशतक केले होते.
-प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मंकड यांनी 218 सामने खेळत 12980 धावा केल्या होत्या. यात 31 शतके आणि 70 अर्धशतकांचा समावेश होता. शिवाय त्यांनी गोलंदाजीत 5/21च्या सर्वोत्तम कामगिरीसह 72 विकेट्स घेतल्या होत्या.
-मंकड यांनी 1971मध्ये वेस्ट इंडिजच्या कसोटी दौऱ्यात उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांनी गावसकरांसोबत सलामीला फलंदाजी करत 68, 74, 72 आणि 123 धावांची भागिदारी केली होती.
-मात्र, 1971मध्येच इंग्लंडविरद्धच्या कसोटी मालिकेत त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्यांच्या कसोटी क्रिकेटच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर ते 5 वर्षात ते केवळ 2 कसोटी सामने खेळले. पण 1976 मध्ये त्यांनी न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन केले.
-निवृत्तीनंतर मंकड यांनी 1999 ते 2000मध्ये मुंबई, मध्य प्रदेश, बडोदा आणि रेल्वे संघाचे प्रशिक्षण केले होते.