संपुर्ण नाव- अतुल सतिश वासन
जन्मतारिख- 23 मार्च, 1968
जन्मस्थळ- दिल्ली
मुख्य संघ- भारत, दिल्ली
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- न्यूझीलंड विरुद्ध भारत, तारिख- 2-5 फेब्रुवारी, 1990
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- न्यूझीलंड विरुद्ध भारत, तारिख- 1 मार्च, 1990
आंतरराष्ट्रीय कसोटी सामने- 4, विकेट्स- 10, सर्वोत्तम कामगिरी- 4/108
आंतरराष्ट्रीय वनडे सामने- 9, विकेट्स- 11, सर्वोत्तम कामगिरी- 3/28
थोडक्यात माहिती-
-दिल्लीचा उंच गोलंदाज अतुल वासन हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू होता. तो खेळपट्टीवर जोरदार फटके मारत असे.
-1990 दरम्यान वासन भारताकडून वनडे आणि कसोटी अशा दोन्हीही क्रिकेट प्रकारात खेळला आहे.
-वासनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगल्या कामगिरीने अनेकांच्या मनावर राज्य केले आहे. 1989-90 दरम्यानचा काळ वासनसाठी शानदार राहिला होता. यावेळी त्याने ईराणी ट्रॉफीत शेष भारत संघाविरुद्ध 5 विकेट्स घेतल्या आणि आपल्या दिल्ली संघाला विजय मिळवून दिला.
-वासनच्या शानदार कामगिरीमुळे त्याची 1990मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर निवड झाली होती. त्याने ख्राईस्टचर्च येथील कसोटी मालिकेतून पदार्पण केले होते.