मराठीत माहिती- क्रिकेटर अतुल वासन

संपुर्ण नाव- अतुल सतिश वासन

जन्मतारिख- 23 मार्च, 1968

जन्मस्थळ- दिल्ली

मुख्य संघ- भारत, दिल्ली

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण-  न्यूझीलंड विरुद्ध भारत, तारिख-  2-5 फेब्रुवारी, 1990

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- न्यूझीलंड विरुद्ध भारत, तारिख- 1 मार्च, 1990

आंतरराष्ट्रीय कसोटी सामने- 4, विकेट्स- 10, सर्वोत्तम कामगिरी- 4/108

आंतरराष्ट्रीय वनडे सामने- 9, विकेट्स- 11, सर्वोत्तम कामगिरी- 3/28

थोडक्यात माहिती-

-दिल्लीचा उंच गोलंदाज अतुल वासन हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू होता. तो खेळपट्टीवर जोरदार फटके मारत असे.

-1990 दरम्यान वासन भारताकडून वनडे आणि कसोटी अशा दोन्हीही क्रिकेट प्रकारात खेळला आहे.

-वासनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगल्या कामगिरीने अनेकांच्या मनावर राज्य केले आहे. 1989-90 दरम्यानचा काळ वासनसाठी शानदार राहिला होता. यावेळी त्याने ईराणी ट्रॉफीत शेष भारत संघाविरुद्ध 5 विकेट्स घेतल्या आणि आपल्या दिल्ली संघाला विजय मिळवून दिला.

-वासनच्या शानदार कामगिरीमुळे त्याची 1990मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर निवड झाली होती.  त्याने ख्राईस्टचर्च येथील कसोटी मालिकेतून पदार्पण केले होते.

You might also like