संपुर्ण नाव- अक्षर राजेशभाई पटेल
जन्मतारिख- 20 जानेवारी, 1994
जन्मस्थळ- आनंद, गुजरात
मुख्य संघ- भारत, दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली डेअरडेविल्स, दुर्हम, गुजरात, भारत अ, भारत ब, भारत क, इंडिया रेड, 23 वर्षांखालील भारतीय संघ, किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि पश्चिम विभाग
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी, 2021, ठिकाण – चेन्नई
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध बांग्लादेश, तारिख – 15 जून, 2014, ठिकाण – ढाका
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 17 जुलै, 2015, ठिकाण – हरारे
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 5 , धावा- 179, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 5, विकेट्स- 36, सर्वोत्तम कामगिरी- 6/38
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 38, धावा- 181, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 38, विकेट्स- 45, सर्वोत्तम कामगिरी- 3/24
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 15, धावा- 78, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 15, विकेट्स- 13, सर्वोत्तम कामगिरी- 3/9
थोडक्यात माहिती-
-अक्षर पटेल अकरावीत असताना त्याचा मित्र धिरन कंसाराने त्याला विद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेण्यास सांगितले होते. तिथून पटेलने या क्षेत्रात पहिल्यांदा पाऊल ठेवले.
-पटेटला मेकॅनिकल इंजिनिअर बनायचे होते. तो अभ्यासातही हुशार होता. मात्र तो क्रिकेट क्षेत्राकडे वळल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट कॅम्पमध्ये दाखल करत त्याला प्रोत्साहन दिले.
-पटेलच्या आजीचे स्वप्न होते की त्याने भारतीय संघाकडून क्रिके खेळावे. असे झाले पण त्या ते पाहण्यासाठी जिंवत नव्हत्या. तो जिल्हास्तरावर एक क्रिकेट सामना खेळत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
-पटेलचा क्रिकेट आदर्श हा युवराज सिंग आहे. त्यांच्या शैलीत बरेच साम्यही आढळून येते.
-पटेलने 2012मध्ये मध्य प्रदेशविरुद्ध प्रथम श्रेणी पदार्पण केले. यावेळी हंगामातील दुसऱ्या सामन्यात दिल्लीविरुद्ध त्याने 55 धावा देत 6 विकेट्स घेतल्या.
-2013-14च्या संपूर्ण रणजी ट्रॉफी हंगामात पटेलने गुजरातकडून खेळताना 46.12च्या सरासरीने 369 धावा केल्या होत्या. तर, 23.58 च्या सरासरीने 29 विकेट्स घेतल्या होत्या. तो गुजरातमधून सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा क्रिकेटपटू ठरला होता.
-2013मध्ये पटेल आयपीएलच्या मुंबई इंडिन्स संघाचा भाग होता. यावेळी त्याने एकही सामना खेळला नाही आणि पुढील हंगामात त्याला किंग्स इलेव्हन पंजाबने विकत घेतले. यावेळी संपूर्ण हंगामात त्याने 14 विकेट्स घेतल्या होत्या.
– पटेलने 2013साली 23 वर्षांखालील भारतीय संघाला एसीसी इमर्जिंग चषक जिंकून दिले होते. त्याच्या उपांत्य फेरीतील 4 विकेट्समुळे असे होणे शक्य झाले होते.
-बीसीसीआयने 2014साली पटेलला 19 वर्षांखालील क्रिकेटर ऑफ द इअर घोषित केले होते. तर, आयपीएलच्या 7व्या हंगामात तो इमर्जिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंटही होता.
-बांग्लादेशविरुद्ध 2014साली पटेलने वनडे पदार्पण केले. यावेळी 59 धावा देत त्याने 1 विकेट घेतली होती.
-जुलै 2015ला पटेलने झिम्बाब्वेविरुद्ध टी20 पदार्पण केले होते. यावेळी पटेलची आकडेवारी 4-0-17-3 असल्याने त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला होता.
-2015साली अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध पटेलने दमदार खेळी केली होती. यावेळी 31 षटके गोलंदाजी करत त्याने 6 षटकात एकही धाव न देता 4 विकेट्स घेतल्या होत्या.