संपुर्ण नाव- बिशन सिंग बेदी
जन्मतारिख- 25 सप्टेंबर, 1946
जन्मस्थळ- अमृतसर, पंजाब
मुख्य संघ- भारत, दिल्ली, नाॅर्थम्पटनशायर आणि उत्तर पंजाब
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 31 डिसेंबर, 1966 ते 5 जानेवारी, 1967
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 13 जुलै, 1974
आंतरराष्ट्रीय कसोटी सामने- 67, धावा- 656, शतके- 0
आंतरराष्ट्रीय वनडे सामने– 10, धावा- 31, शतके- 0
थोडक्यात माहिती-
– वयाच्या 15व्या वर्षी उत्तर पंजाब संघाकडून क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर बिशनसिंग बेदी यांनी दिल्ली संघात(1968-69) प्रवेश केला. तसेच, 1974-75च्या रणजी हंगामात त्याने 64 विकेट्स घेण्याचा विक्रम केला.
– बिशन सिंग बेदी यांनी 60 षटकांच्या विश्वचषक सामन्यात सर्वोत्तम इकोनॉमी रेटने गोलंदाजी करण्याचा विक्रम केला. त्यांनी 12 षटकात 8 धावा देत केवळ 0.50च्या इकोनॉमी रेटने 1 विकेट घेतली होती.
-इंग्लंड (3-1), ऑस्ट्रेलिया (3-2) आणि पाकिस्तान (2-0) विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर सुनील गावस्करच्या ठिकाणी बिशन सिंगला भारतीय संघाचा कर्णधार करण्यात आले होते.
– नाॅर्थम्पटनशायर संघाकडून खेळताना त्याने 370 प्रथम श्रेणी डावात 1560 विकेट्स घेतल्या. प्रथम श्रेणी डावात 1560 विकेट्स घेणारे ते पहिलेच भारतीय गोलंदाज होते.
-त्यांचा मुलगा अंगद बेदी हा अभिनेता असून सून नेहा धुपिया अभिनेत्री आहे.