संपुर्ण नाव- ब्रिजेश परशुराम पटेल
जन्मतारिख- 24 नोव्हेंबर, 1952
जन्मस्थळ- बडोदा, गुजरात
मुख्य संघ- भारत, कर्नाटक, म्हैसूर आणि वेलिंग्टन
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 6 जून ते 11 जून, 1974
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 13 जुलै, 1974
आंतरराष्ट्रीय कसोटी सामने- 21, धावा- 972, शतके– 1
आंतरराष्ट्रीय वनडे सामने– 10, धावा- 243, शतके– 0
थोडक्यात माहिती-
-देशांतर्गत क्रिकेटमध्ये ब्रिजेश पटेल हे फलंदाजासह सत्तरच्या दशकातील एक उल्लेखनीय क्षेत्ररक्षकही होते.
– गुंडप्पा विश्वनाथ यांच्याबरोबर पटेल यांना कर्नाटक संघातील फलंदाजीचा आधारस्तंभ समजले जात होते.
-प्रथम श्रेणी सामन्यात पटेल यांनी 203 सामन्यात 46च्या सरासरीने 11911 धावा केल्या होत्या. यात 37 शतकांचा तर 55 अर्धशतकांचा समावेश होता.
-पटेल यांचे चुलते कृष्णकांत, भूपेन्द्र आणि मुकेश पटेल हे प्रथम श्रेणी सामन्यात खेळले आहेत. तसेच, त्यांचा मुलगा उदित पटेल हा कर्नाटक संघाकडून प्रथम श्रेणी सामन्यात खेळला आहे. तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातही खेळला आहे.
-पटेल यांनी 1970-71मध्ये रणजीत पदार्पण केले होते. तर, बॉम्बे विरुद्धच्या उपांत्य फेरीत त्यांनी नाबाद सर्वाधिक 105 धावांची खेळी केली होती. त्यांनी रणजी ट्रॉफी सामन्यात 57च्या सरासरीने 7126 धावा केल्या होत्या. यात 26 शतकांचा समावेश होता.
-पटेल यांच्यासाठी 1976ची वेस्ट इंडिज संघाविरुद्धची 4 सामन्यांची कसोटी मालिका उल्लेखनीय ठरली होती. या मालिकेत त्यांनी 207च्या सरासरीने 207 धावा केल्या होत्या. यात त्यांनी 115*, 29, 49* आणि 14 अशा धावा केल्या होत्या.
-ब्रिजेश यांनी निवृत्तीनंतर काही काळ बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीचे कामकाज पाहिले. 1999मध्ये त्यांची ‘केएससीए’च्या सचिवपदी नियुक्ती झाली होती. तसेच ते 2009मध्ये कर्नाटक प्रिमीयर लिगमध्येही ते खेळले होते.
-याचबरोबर ते एनसाएचे संचालकही होते आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे मुख्य कार्यकारी अधिकारीही (CEO) होते.