संपुर्ण नाव- चेतेंद्र प्रतापसिंग चौहान
जन्मतारिख- 21 जुलै, 1947
जन्मस्थळ- बरिली, उत्तर प्रदेश
मुख्य संघ- भारत, दिल्ली आणि महाराष्ट्र
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचे फिरकीपटू गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 25 ते 30 सप्टेंबर, 1969
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 1 ऑक्टोबर, 1978
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 40, धावा- 2084, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 40, विकेट्स- 2, सर्वोत्तम कामगिरी- 1/4
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 7, धावा- 153, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-1968मध्ये चेतन चौहान यांनी भारत एकादश संघाकडून क्रिकेटची सुरुवात केली होती. यावेळी आंतरराष्ट्रीय एकादश संघाविरुद्ध खेळताना त्यांनी 2 डावात सलामीला फलंदाजी करताना अनुक्रमे शून्य आणि 31 धावा केल्या होत्या.
-कसोटीत एकही शतक न करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौहान हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 40 कसोटी सामने खेळत 2084 धावा केल्या होत्या. तर, ऑस्ट्रेलियाचे फलंदाज शेन वॉर्न हे या यादीत अव्वल स्थानी आहे.
-1969मध्ये त्यांनी ब्रेबॉर्न स्टेडियमवरील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. यावेळी त्यांनी पदार्पणाच्या सामन्यातच न्यूझीलंडचे गोलंदाज ब्रुस टेलर यांच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला होता.
-चौहान यांनी 1981मध्ये त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला.
-निवृत्तीनंतर 1985 मध्ये चौहान राजकारणाकडे वळले. ते भारतीय जनता पार्टी पक्षात सामील झाले. त्यानंतर बऱ्याच काळानंतर ते 2 वेळा अलमोरा, उत्तर प्रदेशचे खासदार बनले.
-1980मध्ये त्यांनी ऍडलेड क्रिकेट क्लबमध्ये सहभाग घेतला. त्यांनी द हिंद वृत्तपत्रात सांगितले होते की, ते 3 वर्षासाठी क्लबचे कर्णधार आणि प्रशिक्षक होते.
-ऍडलेडशी त्यांच्या अनेक आठवणी जुळलेल्या आहेत. त्यांनी क्लबमध्ये असताना अनेकदा क्रिकेट खेळले होते. तर, त्या शहरातील एका अपघातात त्यांच्या 19 वर्षीय मुलाचे निधन झाले होते.
-चौहान हे बऱ्याचदा भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. 2001 मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी कसोटीच्यावेळी त्यांनी संघाचे व्यवस्थापन केले होते. 2007-08 मध्येही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ते भारताचे व्यवस्थापक होते.