---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर देबाशिष मोहंती

On: शुक्रवार, जून 12, 2020 8:52 PM
---Advertisement---

संपुर्ण नाव- देबाशिष सर्बेश्वर मोहंती

जन्मतारिख- 20 जुलै, 1976

जन्मस्थळ- भुवनेश्वर, ओडिसा

मुख्य संघ- भारत, पंजाब आणि रेल्वे

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 9 ते 13 ऑगस्ट, 1997

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 13 सप्टेंबर, 1997

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 2, धावा- 0, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 2, विकेट्स- 4, सर्वोत्तम कामगिरी- 4/78

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 45, धावा- 28, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 45, विकेट्स- 57, सर्वोत्तम कामगिरी- 4/56

थोडक्यात माहिती-

-प्रशिक्षक के. श्रीकांत यांच्या शिफारसीनुसार देबाशिष मोहंती याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली होती. संधीचे सोने करत त्याने खूप कमी काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली.

-त्याच्या पदार्णाच्या वेळी भारतीय संघात अनेक दमदार फलंदाज होते. मात्र, संघात चांगल्या गोलंदाजाची आवश्यकता होती. ती कमी मोहंती याने भरून काढली.

-त्याच्या दोन्ही बाजूंनी चेंडूस स्विंग करण्याच्या शैलीने त्याने प्रभावित केले होते.

-त्याने ऑगस्ट 1997मध्ये श्रीलंकाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. यावेळी सनथ जयसुर्या, रोशन महानम आणि अरविंद डी स्लिव्हा अशा 3 मोठ्या विकेट्स त्याने आपल्या खात्यात जमा केल्या होत्या.

कोलंबोतील आपला पहिला कसोटी सामना त्याने 78 धावा देत 4 विकेट्स घेत संपवला होता.

-मोहंतीने डाव्या हाताचा पाकिस्तानचा फलंदाज सय्यद अनवर याला बाद करत वनडेतील आपले पदार्पण गाजवले होते. ही 1997मध्ये टोरंटोतील सहारा फ्रेंडशीप चषकमधील भारत आणि पाकिस्तानची पहिली वनडे मालिका होती.

-मोहंतीला 1999च्या विश्वचषकात सुरुवातीला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण, अचानक इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याची निवड झाली. यावेळी ऍलेस स्टिवर्ट आणि ग्राहम हिक यांना बाद करत त्याने भारताला 63 धावांनी सामना जिंकण्यास मदत केली होती.

-तो संपूर्ण विश्वचषकात 10 विकेट्स घेत जवागल श्रीनाथ (12) याच्यानंतर सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला होता.

-मोहंतीच्या 1999च्या विश्वचषतकातील दमदार प्रदर्शनाने त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. विशेष म्हणजे 1999च्या विश्वचषकाचा लोगो हा त्याच्या गोलंदाजी ऍक्शनवरून बनवण्यात आला होता.

-त्याला झालेल्या दुखापती आणि संधींची कमतरता यामुंळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून लवकर निवृत्ती घ्यावी लागली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---