संपुर्ण नाव- दिलीप बळवंत वेंगसरकर
जन्मतारिख- 6 एप्रिल, 1956
जन्मस्थळ- राजपूर, महाराष्ट्र
मुख्य संघ – भारत, मुंबई आणि स्टॅफर्डशायर
फलंदाजीची शैली – उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली – उजव्या हाताचे मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 24 ते 28 जानेवारी, 1976
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 21 फेब्रुवारी, 1976
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 116, धावा- 6868, शतके- 17
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 129, धावा- 3508, शतके- 1
थोडक्यात माहिती-
-1975मध्ये इराणी ट्रॉफीत दिलीप वेंगसरकर यांनी भारतीय शेष संघाविरुद्ध खेळताना मुंबईकडून 110 धावांची शानदार खेळी केली होती आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.
-वेंगसरकर यांनी 1979च्या वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या कसोटीत लिटल मास्टर सुनिल गावसकर यांच्यासह 344 धावांची भागीदारी केली होती. हा पराक्रम त्यांनी कोलकाता येथील इडन गार्डन स्टेडियमवर केला होता आणि दोघांचेही शतक त्यावेळेला पूर्ण झाले होते.
-लॉर्ड्स स्टेडियम हे वेंगसरकर यांच्यासाठी खास आठवणीतील स्टेडियम ठरले आहे. त्यांनी या स्टेडियमवर सलग 3 शतके केली आहेत. याचबरोबर ते लॉर्ड्सवरती असा विक्रम करणारे एकमेव फलंदाज ठरले होते. 1986मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्यांना मालिकावीर पुरस्कारही मिळाला होता.
– वेंगसरकर यांना नवी दिल्लीतील कोटला स्टेडियमही तेवढेच जवळचे आहे. त्यांनी या स्टेडियमवर 4 शतके केली आहेत ज्यातील 3 शतके ही वेस्ट इंडिज संघाविरुद्ध आहेत.
-जेव्हा ते चौथ्या वेळेला इंग्लंड दौऱ्यावर गेले होते, तेव्हा 1982 आणि 1986मध्ये भारतीय संघाचे व्यवस्थापक असणारे राजसिंग दुंगरपूर यांनी वेंगसरकर यांना लता मंगेशकर यांच्या लंडनमधील घरी नेले होते. त्यावेळेला लताजींनी त्यांना जेवनासाठी कोल्हापुरी मटन आणि गाजरचा हलवा बनवला होता.
– वेंगसरकर यांनी 116 कसोटी सामन्यात 17 शतकांसह 6868 धावा केल्या होत्या. त्यांनी शेवटचा सामना 1992 ला खेळला तेव्हा ते सुनिल गावसकर यांच्या पाठोपाठ कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज होते.
-वेंगसरकरांनी 1983 च्या विश्वचषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यानंतर 1987 साली झालेल्या विश्वचषकानंतर त्यांनी कपिल देवच्या जागी भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. कर्णधार म्हणून त्यांनी आपल्या पहिल्याच मालिकेत 2 शतके ठोकली होती.
त्यानंतर 1989मध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडीजचा दौरा केला होता. या दौऱ्यात भारताचा पराभव झाला होता. यानंतर वेंगसरकर यांना कर्णधारपदावरून काढण्यात आले होते. वेंगसकर यांनी 10 कसोटी सामन्यात भारताने नेतृत्व केले.
-वेंगसरकर यांना अर्जुन पुरस्कार तसेच विस्डनचा क्रिकेट ऑफ द इयर पुरस्कारही मिळाला आहे. तसेच क्रिकेटमधील त्यांच्या योगदानामुळे बीसीसीआयने त्यांना सीके नायडू जीवनगौरव पुरस्कारही दिला आहे.
-वेंगसरकर यांनी निवृत्तीनंतर मुंबईमध्ये ईएलएफ वेंगसकर अकॅडमी (Elf-Vengsarkar academy) ही स्वत:ची क्रिकेट अकॅडमी सुरु केली.
-त्यांनी काही काळ बीसीसीआयचे राष्ट्रीय निवडकर्ता म्हणूनही काम पहिले होते. तसेच 2006मध्ये मॅच रेफरीही होते. सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला 2008 ला भारतीय संघात संधी द्यावी असा आग्रह त्यांचाच होता.
-वेंगसरकर यांनी 1990ला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना यावेळी अपयश आले होते.