संपुर्ण नाव- एकनाथ धोंडू सोलकर
जन्मतारिख- 18 मार्च, 1948
जन्मस्थळ- बॉम्बे (आताची- मुंबई), महाराष्ट्र
मृत्यू- 26 जून, 2005
मुख्य संघ- भारत, मुंबई आणि ससेक्स
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 15 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर, 1969
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 13 जुलै, 1974
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 27, धावा- 1068, शतके- 1
गोलंदाजी- सामने- 27, विकेट्स- 18, सर्वोत्तम कामगिरी- 3/28
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 7, धावा- 27, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 7, विकेट्स- 4, सर्वोत्तम कामगिरी- 2/31
थोडक्यात माहिती-
-एकनाथ सोलकर हे एका गरिब कुंटुंबातून आले होते. त्यांचे वडिल धोंडू सोलकर हे मुंबईतील हिंदू जिमखाना येथे ग्रांउन्ड्समन होते. त्यावेळी सोलकर हे त्यांच्या वडिलांसोबत क्रिकेटच्या सामन्यादरम्यान धावफलक बदलण्याचे काम करत असत.
-त्यांना एकूण 5 भावंडे होती. त्यांचा लहानभाऊ अनंत सोलकर हा प्रथम श्रेणी सामन्यात महाराष्ट्र आणि रेल्वे संघाकडून खेळला होता. त्यावेळी त्याने 26 प्रथम श्रेणी सामन्यात 63 विकेट्स घेतल्या होत्या.
-सोलकर यांनी बॉम्बे संघातून 1966-67मध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण केले होते. यावेळी खेळताना त्यांनी पदार्पणाच्या सामन्यतच 38 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.
-सोलकर यांनी 189 प्रथम श्रेणी सामने खेळले होते. ज्यात त्यांनी 29.27च्या सरासरीने 6851 धावा केल्या होत्या. यात 8 शतके आणि 36 अर्धशतकांचा समावेश होता. याचबरोबर त्यांनी एकूण 276 विकेट्स घेतल्या होत्या.
– सोलकर यांना हे कसोटीतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी अवघ्या 27 कसोटी सामन्यात 53 झेल घेतले होते. त्यांच्यानंतर असा विक्रम केवळ ऑस्ट्रेलियाच्या बॉब सिम्पसन यांनी केला होता. सिम्पसन यांनी 62 कसोटी सामन्यात 110 झेल घेतल्या होत्या.
-सोलकर यांनी 1969-70मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. त्यांना मिस्टर डिपेंडेबल हा टॅग देखील देण्यात आला होता.
-1970-71च्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत सोलकर यांचे योगदान अविस्मरणीय ठरले. ते फलंदाजीस येण्यापुर्वी संघाच्या 5 बाद 75 धावा झाल्या होत्या. त्यांनी पुढे फलंदाजी करत अर्धशतकी (61) खेळी केली होती. तसेच, निर्णायक सामन्याच्या वेळी त्यांनी दिलेले धावांचे योगदानही भारतीय संघासाठी महत्त्वाचे ठरले होते. याचबरोबर त्यांनी या मलिकेत 6 झेलही पकडले होते.
-सोलकर यांनी एकूण 27 कसोटी सामने खेळले होते. त्यांचा अखेरचा कसोटी सामना खेळताना ते अवघ्या 28 वर्षाचे होते. त्यांनी कसोटी कारकिर्दीत 25.42च्या सरासरीने 1068 धावा केल्या होत्या.
-सोलकर यांचा मधुमेहामुळे (DIABETES) वयाच्या 57व्या वर्षी मृत्यू झाला.