संपुर्ण नाव- गुरशरण सिंग
जन्मतारिख- 8 मार्च, 1963
जन्मस्थळ- अमृतसर, पंजाब
मुख्य संघ- भारत, दिल्ली, पंजाब
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- न्यूझीलंड विरुद्ध भारत, तारिख- 22-26 फेब्रुवारी, 1990
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, तारिख- 8 मार्च, 1990
आंतरराष्ट्रीय कसोटी सामने- 1, धावा- 18, शतके– 0
आंतरराष्ट्रीय वनडे सामने- 1, धावा- 4, शतके- 0
थोडक्यात माहिती-
–गुरशरण सिंग हा पंजाबच्या फलंदाजीतील एक महत्त्वाचा भाग होते. 1992-93 मध्ये पंजाबने रणजी ट्रॉफी जिंकली तेव्हा सातत्यपूर्ण कामगिरी करत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
– 1988-89 मध्ये ईडन गार्डन्स येथे पंजाब विरुद्ध पश्चिम बंगाल संघात रणजी ट्रॉफीतील उपांत्यपूर्व फेरी सामना पार पडला. या सामन्यात गुरशरण यांनी नाबाद 298 धावांची अविस्मरणीय खेळी केली होती.
-1990 मध्ये भारत जेव्हा न्यूझीलंड दौर्यावर होता, तेव्हा गुरशरणने आपल्या देशासाठी फक्त एक कसोटी सामना खेळला होता.
–अखेर भारतीय निवडकर्त्यांनी गुरशरणची धावा करण्याची क्षमता ओळखली आणि त्याला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी दौर्यासाठी निवडले. या दौऱ्यात ऑकलंडमध्ये त्याने कसोटी पदार्पण केले. यावेळी त्याने अवघ्या 18 धावा केल्या. ही त्याच्या कारकीर्दीतील शेवटची कसोटी देखील ठरली.
-त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामना खेळला. पण नंतर त्यांनी भारताकडून एकही सामना खेळला नाही.
-1994-95 नंतर गुरशरणने देशांतर्गत क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. यानंतर त्यांनी गुरगाव येथे गुरशरण सिंग कोचिंग एकॅडेमी सुरु केली.
– 1987 ला त्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित होणारे केवळ दुसरे क्रिकेट प्रशिक्षक होते.