संपुर्ण नाव- हरविंदर सिंग
जन्मतारिख- 23 डिसेंबर, 1977
जन्मस्थळ- अमृतसर, पंजाब
मुख्य संघ- भारत, पंजाब आणि रेल्वे
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (वेगवान)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 6 ते 10 मार्च, 1998
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 13 सप्टेंबर, 1997
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 3, धावा- 6, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 3, विकेट्स- 4, सर्वोत्तम कामगिरी- 2/62
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 16, धावा- 6, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 16, विकेट्स- 24, सर्वोत्तम कामगिरी- 3/44
थोडक्यात माहिती-
-हरविंदर सिंग याचा जन्म अमृतसरच्या सरदार हरदेव सिंग यांच्या कुटुंबात झाला. त्याचा भाऊ मनदिप सिंग हा पण क्रिकेटपटू आहे.
-हरविंदर हा किशोरवयात मध्यमगती गोलंदाज होता. यावेळी 19 वर्षांखालील कसोटी सामन्यात त्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध विशेष खेळी केली होती. 1996मध्ये कानपूर येथे त्याने मार्क बाउचर यांची विकेट घेतली होती.
-1997ला टोरंटो येथील पाकिस्तानविरुद्धच्या सहारा चषक सीरिजमधून हरविंदरने वनडेत पदार्पण केले होते. यावेळी सामना जिंकण्यात त्याने आणि देबाशिष मोहंतीने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
-हरविंदरच्या काळात भारतीय संघात आशिष नेहरा आणि झहीर खान यांचे आगमन झाल्याने त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द जास्त मोठी ठरू शकली नाही.
-1998ला ऑस्ट्रेलियाविरु्दधच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण करणाऱ्या हरविंदरने पहिलीच विकेट ही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मार्क टेलरची घेतली होती.
-1997 ते 2001 या काळात त्याने 3 कसोटी आणि 16 वनडे सामने खेळले.
-हरविंदरची गोलंदाजी शैली उत्कृष्ट होतीच पण कुठे ना कुठे तरी त्याच्या इकॉनॉमी रेटमुळे त्याला जास्त सामने खेळायची संधी मिळाली नाही.
-वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली.
-एवढेच नाही तर, देशांतर्गत क्रिकेटमधील आकडेवारीनेही तो 2008मध्ये क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्त झाला.
-2020मध्ये हरविंदरची भारतीय पुरुष संघाच्या निवडकर्ता पदी नियुक्ती झाली आहे.