संपुर्ण नाव- ऋषिकेश हेमंत कानिटकर
जन्मतारिख- 14 नोव्हेंबर, 1974
जन्मस्थळ- पुणे, महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत, एअर इंडिया, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 26 ते 30 डिसेंबर, 1999
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 25 डिसेंबर, 1997
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 2, धावा- 74, शतके- 0
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 34, धावा- 339, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 34, विकेट्स- 17, सर्वोत्तम कामगिरी- 2/22
थोडक्यात माहिती-
-ऋषिकेश कानिटकर हे क्रिडापटूंच्या कुटुंबातले आहेत. त्यांचे वडील हेमंत यांनी भारत आणि महाराष्ट्र संघाकडून क्रिकेट खेळले होते. त्यांचा भाऊ आदित्य हा गोल्फ खेळतो. तर, आदित्यची पत्नी राधिका तुळपुळे ही माजी टेनिसपटू होती.
-विशेष बाब अशी की, कानिटकर आणि वडील हेमंत यांनी खेळलेल्या कसोटी सामन्यांची संख्या सारखीच होती. दोघांनीही भारताकडून 2 कसोटी सामने खेळले होते.
-कानिटकर यांनी रणजी ट्रॉफीच्या महाराष्ट्र विरुद्ध मुंबई संघाकडून प्रथम श्रेणीत पदार्पण केले होते. डिसेंबर 1994च्या या सामन्यात त्यांनी 6व्या क्रमांकावर फलंदाजी करत 44 धावा केल्या. तर, मुंबईच्या सुलक्षण कुलकर्णीची एकमेव विकेट घेतली.
-कानिटकर यांनी डिसेंबर 1997पासून ते जानेवारी 2000पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. यादरम्यान त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून 2 कसोटी आणि बऱ्याच देशांकडून 34 वनडे सामने खेळले.
-1998ला वेस्ट इंडिजमध्ये कानिटकर हे भारत अ संघाचे नेतृत्तव करत होते. त्यावेळी अचानक त्यांंना अजय जडेजाच्या जागी भारतीय संघात खेळण्यासाठी बोलवण्यात आले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत त्यांना चांगली कामगिरी न करता आल्याने पुढे कसोटी खेळण्याची त्यांना संधी मिळाली नाही.
-जानेवारी 1998मध्ये कानिटकरांनी त्यांच्या तिसऱ्या वनडे सामन्यात लक्षणीय कामगिरी केली होती. त्यावेळी पाकिस्तानविरुद्ध जिंकण्यासाठी भारताला 2 चेंडूत 3 धावा करण्याची गरज होती. यावेळी 7व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कानिटकरांनी येताच चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला होता.
-देशांतर्गत महाराष्ट्र संघाकडून 14 हंगाम खेळल्यानंतर कानिटकर यांनी 2008मध्ये मध्य प्रदेश संघात प्रवेश केला. पुढे 2 हंगामानंतर ते राजस्थान संघात सामाविष्ट झाले. यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानने 2010-11 आणि 2011-12 असे 2 रणजी ट्रॉफी चषक पटकावले होते.
-कानिटकरांच्या 146 प्रथम श्रेणी सामन्यातील 10400 धावांनी त्यांना देशांतर्गत स्तरावर चांगला दर्जा मिळवून दिला. त्यांची रणजी ट्रॉफीतील (105 सामने, 8059 धावा) आकडेवारीही उल्लेखनीय होती.
-कानिटकरांना त्यांच्या कारकिर्दीची 19 वर्षे झटल्यानंतर ते प्रिमियर देशांतर्गत स्पर्धेत सर्वाधिक धावा घेणारे तिसरे क्रिकेटपटू ठरले.
-कानिटकरांनी पुढे मध्य प्रदेश आ णि राजस्थान संघाला प्रशिक्षण दिले. तर निवृत्तीनंतर त्यांनी बीसीसीआयच्या 19 वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठी कॅम्पही घेतले.
-आयपीएलच्या 9व्या मोसमात ते राइजिंग सुपरजायंट्सचे सहाय्यक प्रशिक्षक होते. तर, पुढे राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत निवड झाल्याने ते भारतीय संघाचे प्रशिक्षकही बनले.