संपूर्ण नाव- इशांत शर्मा
जन्मतारिख- 2 सप्टेंबर, 1988
जन्मस्थळ- दिल्ली
मुख्य संघ- भारत, डेक्कन चार्जर्स, दिल्ली, दिल्ली कॅपिटल्स, दिल्ली डेअरडेविल्स, भारत अ, इंडिया ब्ल्यू, इंडिया रेड, 19 वर्षांखालील भारतीय संघ, किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स, उत्तर विभाग, ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, शेष भारतीय संघ, राइजिंग पुणे सुपरजायंट्स, सनराइजर्स हैद्राबाद आणि ससेक्स
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध बांग्लादेश, तारिख – 25 ते 27 मे, 2007, ठिकाण – ढाका
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 29 जून, 2007, ठिकाण – बेलफास्ट
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 1 फेब्रुवारी, 2008, ठिकाण – मेलबर्न
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 105, धावा- 785, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 105, विकेट्स- 311, सर्वोत्तम कामगिरी- 7/74
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 80, धावा- 72, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 80, विकेट्स- 115, सर्वोत्तम कामगिरी- 4/34
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 14, धावा- 8, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 14, विकेट्स- 8, सर्वोत्तम कामगिरी- 2/34
थोडक्यात माहिती-
-इशांत शर्मा हा भारतीय संघातील सर्वात उंच क्रिकेटपटू आहे. त्याची उंची 6 फूट 4 इंच इतकी आहे.
-मुनाफ पटेलला झालेल्या दुखापतीनंतर मे 2007मध्ये इशांतला बांग्लादेश कसोटी दौऱ्यावर पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.
-इशांत 2006च्या 19 वर्षांखालील इंग्लंड सघाविरुद्ध 19 वर्षांखालील भारतीय संघाचा भाग होता. त्याने 19 वर्षांखालील वनडे आणि कसोटी संघात विराट कोहलीसोबत पदार्पण केले होते.
-एवढेच नाही तर, विराट आणि इशांतने 2006-07च्या हंगामात तमिळनाडूविरुद्ध त्यांचे प्रथम श्रेणी आणि रणजी ट्रॉफी पदार्पण केले होते.
-2008मधील ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू रिकी पाँटिंगच्या विकेटने इशांतला एका रात्रीत हिरो बनवले होते. त्यावेळी इशांतला ते षटक गोलंदाजीसाठी देण्यासाठी विरेंद्र सेहवागने संघाचा कर्णधार अनिल कुंबळेकडे शिफारस केली होती.
-आयपीएल 2008च्या पहिल्या हंगामात इशांतला कोलकाता नाईट रायडर्सने 9 लाख 50 हजार युएसडीला विकत घेतले होते. यावेळी त्याने संपूर्ण हंगामात 7 विकेट्स घेतल्या होत्या.
-इशांतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व स्वरूपात मिळून इंग्लंडचा कर्णधार ऍलेस्टर कूकला सर्वाधिक 9 वेळेला बाद केले आहे.
-भारताविरुद्ध कसोटीत कूकने 294, माइकल क्लार्कने नाबाद 329 आणि ब्रँडन मॅकलमने 302 धावा अशा सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यांच्या या धावा होण्याचे कारण म्हणजे इशांतने योग्स वेळेला त्यांचे सोडलेले झेल.
-इशांतने कसोटीत 7 वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. यातील 2 वेळा वेस्ट इंडिजमध्ये, 2 वेळा न्यूझीलंडमध्ये, 1 वेळा इंग्लंडमध्ये आणि 1 वेळा मायदेशात कसोटी खेळताना त्यांनी हा पराक्रम केला आहे.
-2011-12च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात इशांतने 152.2 किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी केली होती. आतापर्यंत हा त्याने टाकलेला सर्वात वेगवान चेंडू होता.
-इशांतला त्याचे जवळचे मित्र लंबू म्हणतात. त्याला हे टोपन नाव त्याच्या उंचीमुळे पडले.
-2008च्या ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ बँक सीरीजमध्ये इशांतने सर्वाधिक 14 विकेट्स घेतल्या होत्या. यासह सीरीजमध्ये तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता.
-तसेच, 2008च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक 15 विकेट्स घेत, इशांत मालिकावीर बनला होता. 1983 पासून कपिल देवनंतर मालिकावीर बनणारा तो पहिलाच वेगवान भारतीय गोलंदाज होता.
-इशांत शर्माला वेंकटेश प्रसाद यांनी गोलंदाजीचे प्रशिक्षण दिले होते. त्यांनी इशांतला रिव्हर्स स्विंग गोलंदाजी करायला शिकवले.
-2013च्या इंग्लंडमधील चॅम्पियन्स ट्रॉफीत इशांतने 10 विकेट्स घेतल्या होत्या. पण अंतिम सामन्यातील मॉर्गन आणि बोपारा यांची विकेट त्याच्यासाठी विशेष ठरली.
-2011मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळताना इशांतने 12 धावांत 5 विकट्स घेतल्या होत्या. त्याच्या या कामगिरीने कोची टस्कर्सविरुद्ध डेक्कनने विजय मिळवला होता.
– 2014ला लॉर्ड्समधील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावातील इशांतच्या 7/74 या सर्वोत्तम कामगिरीने भारताला अविस्मरणीय विजय मिळवून दिला होता.
हेही वाचा-
Asia Cup 2023: कुठे आणि कसा पाहायचा भारत-पाकिस्तान सामना, लगेच जाणून घ्या
डेवाल्ड ब्रेविसचे आंतरराष्ट्रीय पदार्पणात अपयशी! अष्टपैलू हिरोवरून झिरोवर