संपुर्ण नाव- जयंत यादव
जन्मतारिख- 22 जानेवारी, 1990
जन्मस्थळ- दिल्ली
मुख्य संघ- भारत, दिल्ली डेअरडेविल्स, हरियाणा, भारत अ, भारत ब, इंडिया इमर्जिंग टीम, इंडिया ग्रीन, 23 वर्षांखालील भारतीय संघ, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, मुंबई इंडियन्स आणि शेष भारतीय संघ
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 17 ते 21 नोव्हेंबर, 2016, ठिकाण – विशाखापट्टणम
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 29 ऑक्टोबर, 2016, ठिकाण – विशाखापट्टणम
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 4, धावा- 228, शतके- 1
गोलंदाजी- सामने- 4, विकेट्स- 11, सर्वोत्तम कामगिरी- 3/30
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 1, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 1, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/8
थोडक्यात माहिती-
-2011मध्ये वयाच्या 21व्या जयंत यादवने हरियाणाकडून प्रथम श्रेणीत पदार्पण केले होते. त्यावेळी त्याने गुजरातच्या फलंदाजांच्या दोन्ही डावात प्रत्येकी 3 विकेट्स घेत सर्वांना प्रभिवत केले होते.
-2012मध्ये जयंतने त्याच्यातील फलंदाजी कौशल्य दाखवून दिले होते. यावेळी कर्नाटकविरुद्ध प्रथम श्रेणी सामन्यात त्याने 211 धावा केल्या होत्या. तसेच अमित मिश्रासोबत मिळून 8व्या विकेटसाठी 392 धावांची भागिदारी रचली होती.
-2012साली इंग्लंडच्या भारत दौऱ्यावर जयंतने त्याच्या कारकिर्दीतील अनमोल विकेट घेतली होती. यावेळी अहमदाबाद येथे झालेल्या इंग्लंड एकादशविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात जयंतने 4 विकेट्स घेतल्या होत्या. यात अलेस्टर कूकची विकेट ही त्याच्यासाठी महत्त्वाची ठरली.
-राजकोट येथील सौराष्ट्रविरुद्धच्या प्रथम श्रेणी सामन्यात जयंतने 13 विकेट्स घेतल्या होत्या. 2014-15मध्ये झालेल्या या सामन्यात त्याने पहिल्या डावात 7/64 आणि दुसऱ्या डावात 6/90 अशी कामगिरी केली होती.
-शिवाय 2014-15च्या संपूर्ण हंगामात 33 विकेट्स घेत तो हरियाणातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्यामुळे त्याला भारत अ संघाकडून दक्षिण आफ्रिका अ आणि बांग्लादेश अ विरुद्ध अ दर्जाचे क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली.
-2015-16 या रणजी ट्रॉफी हंगामाची सुरुवात जयंतने शतकाने केली. यावेळी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत त्याने संघसहकारी विरेंद्र सेहवागसोबत मिळून 206 धावांची भागिदारी रचली होती.
-2015-16मध्ये इराणी चषकात शेष भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयाचा जयंत भाग होता. यावेळी 2014-15 रणजी ट्रॉफी विजेत्या मुंबई संघाच्या 8 फलंदाजांना जयंतने बाद केले होते. तसेच त्याने दोन्ही डावात मिळून 65 धावांचे योगदान दिले होते.
-2015मध्ये दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून जयंतने 3 सामने खेळले होते. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट हा 4.14 इतका होता.
-आयपीएल 2016च्या सुरुवातीला जयंतचा इकोनॉमी रेट (5.62) हा टी20 क्रिकेटमधील उत्कृष्ट इकोनॉमी रेट होता. हंगामाच्या शेवटी त्याचा इकोनॉमी रेट हा 5.97 इतका राहिला.
-आयपीएलमधील त्याच्या खेळीने 2016मध्ये जयंतला कसोटी आणि वनडेत पदार्पण करण्याची संधी मिळाली.
-त्याने नोव्हेंबर 2016मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. कसोटीत एकूण 4 सामने खेळत त्याने228 धावा आणि 11 विकेट्स घेतल्या आहेत. तर, ऑक्टोबर 2016मध्ये त्याने एकमेव वनडे सामना खेळला. हा सामना त्याने न्यूझीलंडविरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळला.