संपुर्ण नाव- जयदेव दिपकभाई उनाडकट
जन्मतारिख- 18 ऑक्टोबर, 1991
जन्मस्थळ- पोरबंदर
मुख्य संघ- भारत, भारत पेट्रोलियम कार्पोरेटेड लिमीटेड, दिल्ली डेअरडेविल्स, भारत अ, भारत ब, इंडिया ब्ल्यू, इंडिया इमर्जिंग प्लेयर्स, इंडिया ग्रीन, इंडिया रेड, इंडिया रेवेन्यू, 19 वर्षांखालील भारतीय संघ, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, शेष भारतीय संघ, राइजिंग पुणे सुपरजायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सौराष्ट्र, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एकादश आणि 19 वर्षांखालील सौराष्ट्र संघ
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 16 ते 20 डिसेंबर, 2010, ठिकाण – सेन्चुरियन
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 24 जुलै, 2013, ठिकाण – हरारे
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 18 जून, 2016, ठिकाण – हरारे
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 2, शतके- 0
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
गोलंदाजी- सामने- 7, विकेट्स- 8, सर्वोत्तम कामगिरी- 4/41
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
गोलंदाजी- सामने- 10, विकेट्स- 14, सर्वोत्तम कामगिरी- 3/38
थोडक्यात माहिती-
-भारताचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटचा जन्म पोरबंदर येथे, महात्मा गांधीच्या जन्मस्थळी झाला.
-आयपीएलच्या सुरुवातीच्या काही वर्षात कोलकाता नाईट रायडर्सचे गोलंदाजी प्रशिक्षक वसिम अक्रम यांनी उनाडकटला संघात स्थान दिले होते.
-2010 मध्ये ग्रेस रोड येथील वेस्ट इंडिज अ विरुद्धच्या सामन्यातून उनाडकटने प्रथम श्रेणीत पदार्पण केले होते. यावेळी त्याने 103 धावा देत 13 विकेट्स घेतल्या होत्या.
-उनाडकटने त्याचा एकमेव कसोटी सामना 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध खेळला. जोहान्सबर्गमधील वंडरर्स स्टेडियमवरील त्या सामन्यात उनाडकट फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीतही अपयशी ठरला होता.
-2013 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध उनाडकटने आपला वनडे सामना खेळला. त्यानंतर पुढे तो फक्त 6 वनडे सामन्यात खेळताना दिसून आला.
-भारत अ कडून 2012-13साली न्यूझीलंड अ विरुद्ध उनाडकटने 9 विकेट्स घेतल्या होत्या. यावेळी त्याने 3 सामन्यात 15.77च्या सरासरीने ह्या विकेट्स घेतल्या होत्या. यात त्याच्या एका डावात घेतलेल्या 4 विकेट्सचा समावेश होता.
-2014 मध्ये झालेल्या दुखापतीमुळे उनाडकट बरेच दिवस क्रिकेटपासून दूर होता. 2015-16मध्ये त्याने रणजी ट्रॉफीत दमदार पुनरागमन केले होते. संपूर्ण हंगामात 40 विकेट्स घेत त्याने सौराष्ट्र संघाला अंतिम सामन्यात पोहोचवले होते.
-2017 साली आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंमध्ये उनाडकट दुसऱ्या क्रमांकावर राहिला. यामुळे तो पुढील आयपीएल हंगामात सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला 2018 मध्ये राजस्थान रॉयल्सने 11.50 कोटींना विकत घेतले होते.
– रणजी ट्रॉफीमध्ये उनाडकटने सौराष्ट संघाचे नेतृत्वही केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलिया वनडे संघाचा नवा कर्णधार जाहीर! डेविड वॉर्नरला बसला मोठा धक्का
पहिला आणि एकमेव; रोहित वा विराट नव्हे तर ‘या’ एकट्या भारतीय धुरंधराने टी२० विश्वचषकात ठोकलंय शतक






