संपुर्ण नाव- कारसन देवजीभाई घावरी
जन्मतारिख- 28 फेब्रुवारी, 1951
जन्मस्थळ- राजकोट, गुजरात
मुख्य संघ- भारत, मुंबई आणि सौराष्ट्र
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचे मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 27 डिसेंबर, 1974 ते 1 जानेवारी, 1975
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 7 जून, 1975
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 39, धावा- 913, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 39, विकेट्स- 109, सर्वोत्तम कामगिरी- 5/33
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 19, धावा- 114, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 19, विकेट्स- 15, सर्वोत्तम कामगिरी- 3/40
थोडक्यात माहिती-
-राजकोट येथे जन्मलेल्या घावरी यांनी नोकरीसाठी बॉम्बेला स्थलांतर केले होते. ते तेथे एसीसी सिमेंटच्या कंपनीत नोकरी करत होते.
-त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन सुरुवातीला सौराष्ट्र संघाकडून रणजी ट्रॉफीत क्रिकेट खेळले होते.
-1974-75-मध्ये घावरी यांनी कोलकाता येथील वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. त्यावेळी नवाब पटौदी यांच्या नेतृत्वाखाली मदन लाल आणि घावरी या 2 अष्टपैलू गोलंदाजांचा संघात समावेश होता.
-कारसन घावरी हे भारतीय कसोटी इतिहासातील एक चांगले अष्टपैलू गोलंदाज म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे ते चेंडूला चांगली उसळी द्यायचे. तसेच गरज पडल्यास ते फिरकी गोलंदाजीही करत असत.
-घावरींच्या बाउन्सर्सला अनेक फलंदाज घाबरत असत. एका वेळेला तर, सलामीवीर फलंदाज दिलीप वेंगसकर त्यांच्याकडे आले आणि त्यांनी घावरीचे पाय धरत त्यांच्याविरुद्ध बाउन्सर टाकू नका अशी विनवणी केली होती.
-घावरी यांनी 159 प्रथम श्रेणी सामन्यात 7/34च्या सर्वोत्तम कामगिरीसह 452 विकेट्स घेतल्या होत्या.
– घावरी यांना भारतातील अव्वल 5 गोलंदाजांमध्ये गणले जाते. यात कपिल देव, जवागल श्रीनाथ, इरफान पठाण आणि झहीर खान यांचा समावेश होता.
-ते फलंदाजी आणि गोलंदाजीतही सराईत होते खरे मात्र, त्यांना क्षेत्ररक्षणात अधिक रूची नव्हती.
-निवृत्तीनंतर घावरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्या जागी रणजी ट्रॉफीतील बॉम्बे संघाचे प्रशिक्षण केले होते. पुढे ते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सुधारणा विभागातही सामील झाले होते.