संपुर्ण नाव- कुलदीप यादव
जन्मतारिख- 14 डिसेंबर, 1994
जन्मस्थळ- कानपूर, उत्तर प्रदेश
मुख्य संघ- भारत, मध्य विभाग, भारत अ, 19 वर्षांखालील भारतीय संघ, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, उत्तर प्रदेश आणि 19 वर्षांखालील उत्तर प्रदेश संघ
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 25 ते 28 मार्च, 2017, ठिकाण – धरमशाला
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 23 जून, 2017, ठिकाण – पोर्ट ऑफ स्पेन
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 9 जुलै, 2017, ठिकाण – किंगस्टन
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 7, धावा- 54, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 7, विकेट्स- 26, सर्वोत्तम कामगिरी- 5/57
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 65, धावा- 118, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 60, विकेट्स- 107, सर्वोत्तम कामगिरी- 6/25
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 23, धावा- 43, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 21, विकेट्स- 41, सर्वोत्तम कामगिरी- 5/24
थोडक्यात माहिती-
-कुलदीप यादव हा उत्तर प्रदेशच्या शिव सिंग खेरा या छोट्याश्या गावात जन्मला. त्याचे वडील हे वीटभट्टी मालक होते. यादवच्या जन्मानंतर काही वर्षांनी ते कानपूर येथे स्थायिक झाले.
-यादवला त्याचा क्रिकेट आदर्श वसिम अक्रमप्रमाणे वेगवान गोलंदाजी करायची होती. पण जेव्हा तो कानपूरमधील कपिल पांडे या प्रशिक्षकांनी भेटला, तेव्हा त्यांच्या सल्ल्यानुसार त्याने फिरकी गोलंदाजी करायचे ठरवले.
– सुरुवातीला 2012मध्ये कुलदीप 17 वर्षांचा असताना त्याची 19 वर्षांखालील भारतीय संघात निवड झाली होती. पण त्याला त्यासालच्या 19 वर्षांखालील विश्वचषकात मात्र खेळायला मिळाले नाही.
-अखेर 2014सालच्या 19 वर्षांखालील आयसीसी विश्वचषकात कुलदीपचा समावेश होता. विशेष म्हणजे यावेळी त्याने स्कॉटलंडविरुद्ध हॅट्रित घेतली होती.
-2012मधील आयपीएलच्या मुंबई इंडियन्स या फ्रंचायझीचाही तो भाग होता. पण दुर्देवाने त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, त्याला सचिन तेंडुलकरसोबत त्यावेळी सराव करायला मिळाला होता.
-पहिल्या 10 प्रथम श्रेणी सामन्यात कुलदीपने 131 धावा केल्या होत्या. तसेच 3.84च्या इकोनॉमी रेटने 29 विकेट्स घेतल्या होत्या.
-ऑक्टोबर 2014मध्ये कुलदीपला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली होती. पण, खेळाडू आणि बोर्ड यांच्यातील वादामुळे वेस्ट इंडिजचा दौरा मधातच थांबवण्यात आला. त्यामुळे कुलदिपच्या पदार्पणाची संधी हुकली.
-2014मधील टी20 चॅम्पियन्स लीगमध्ये कुलदीपने कोलकाता नाईट रायडर्सकडून विशेष कामगिरी केली होती. यावेळी 5 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच संंघाच्या अंतिम सामन्यातही त्याने विशेष कामगिरी केली होती.
-2017मध्ये धरमशाला येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत कुलदीपने कसोटी पदार्पण केले. यासह कसोटीच्या 82 वर्षांच्या इतिहासात भारताकडून खेळणारा तो पहिला चायनामन ठरला. यावेळी डेविड वॉर्नरची त्याने पहिली विकेट घेतली. संपूर्ण सामन्यात त्याने 4/68 अशी कामगिरी केली.