संपुर्ण नाव- लक्ष्मण शिवरामकृष्णन
जन्मतारिख- 31 डिसेंबर, 1965
जन्मस्थळ- मद्रास (आताची चेन्नई)
मुख्य संघ- भारत, बडोदा आणि तमिळनाडू
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (लेगब्रेक गुगली)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज , तारिख -28 एप्रिल ते 3 मे, 1983
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 20 फेब्रुवारी, 1985
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 9, धावा- 130, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 9, विकेट्स- 26, सर्वोत्तम कामगिरी- 6/64
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 16, धावा- 5, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 16, विकेट्स- 15, सर्वोत्तम कामगिरी- 3/35
थोडक्यात माहिती-
-लक्ष्मण शिवरामकृष्णन यांना शिवा आणि एलएस या नावाने ओळखले जात होते.
-शिवरामकृष्णन हे अशा क्रिकेटपटूंपैकी एक होते ज्यांच्याकडे प्रचंड कौशल्य असूनही त्यांना देशासाठी जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. पक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्हे तर, त्यांना देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपल्या शैलीला दाखवण्याची जास्त संधी मिळाली नव्हती.
-ते असे क्रिकेटपटू होते ज्यांनी खूप कमी वयात फिरकी गोलंदाजीतील लेग स्पिन हा अवघड प्रकार शिकला होता आणि ते यात माहीर होते.
-त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1984-85ची कसोटी मालिका पूर्ण खेळली होती. यावेळी इंग्लंडविरुद्ध त्यांनी संपूर्ण मालिकेत 23 विकेट्स घेतल्या होत्या. या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील त्यांच्या 12 विकेट्सने भारताला 8 विकेट्स राखून सामना जिंकण्यास मदत केली होती. विशेष म्हणजे, 1981पासून भारताने जिंकलेला तो पहिला कसोटी सामना होता.
-त्यानंतर त्यांना काही काळ संघाबाहेर रहावे लागले. शेवटी 1985-86मधील श्रीलंंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना खेळून त्यांनी कसोटीतून निवृत्ती घेतली.
-त्यानंतर 1987 सालच्या विश्वचषकात त्यांनी अनपेक्षित पुनरागमन करत 2 सामने खेळले होते.
-त्यांना गोलंदाजीसह ते चांगली फलंदाजीही करु शकत होतेे. 1987-88च्या रणजी ट्रॉफीत त्यांनी तमिळनाडू संघाकडून 3 शतके केली होती.
-क्रिकेटमधील निवृत्तीनंतर शिवरामकृष्णन यांनी काही काळ कॉमेन्ट्री केली. याचबरोबर ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल क्रिकेट कमिटीत भारतीय खेळाडूंचे प्रतिनिधी होते.