---Advertisement---

मराठीत माहिती – क्रिकेटर मदनलाल शर्मा

On: रविवार, मार्च 20, 2022 7:33 AM
---Advertisement---

संपुर्ण नाव- मदनलाल उद्धवराम शर्मा

जन्मतारिख- 20 मार्च, 1951

जन्मस्थळ- अमृतसर, पंजाब

मुख्य संघ- भारत, दिल्ली आणि पंजाब

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण-  भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 6 जून ते 11 जून, 1974

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 13 जुलै, 1974

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-

फलंदाजी: सामने- 39, धावा- 1042, सरासरी- 22.65

गोलंदाजी: सामने- 39, विकेट्स- 71, सर्वोत्तम कामगिरी- 5/23

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी: सामने- 67, विकेट्स- 73, सर्वोत्तम कामगिरी- 4/20

गोलंदाजी: सामने- 67, धावा- 401, सरासरी- 19.09

थोडक्यात माहिती- 

-मदनलाल यांनी प्रथम श्रेणी सामन्यात 42.87च्या सरासरीने 10204 धावा केल्या होत्या. याचबरोबर 25.50च्या सरासरीने 625 विकेट्स घेतल्या

-मदनलाल यांनी 1968-69मध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी तिसऱ्या रणजी सामन्यात जम्मू-काश्मीर संघाविरुद्ध 8 विकेट्स घेतल्या होत्या. तर, 1971-72मध्ये दिल्ली विरुद्धच्या सामन्यात 53 धावा देत 7 विकेट्स  घेतल्या होत्या.

-एकंदरीत त्यांनी त्यांच्या रणजी कारकिर्दीत 5270 धावा आणि 351 विकेट्स घेतल्या होत्या. त्यांचा हा विक्रम राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ठ होता.

– त्यांच्या गोलंदाजीच्या शैलीमुळे 1977-78मध्ये त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यास संधी देण्यात आली होती. यावेळी झालेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेपैकी पहिल्या 2 सामन्यात त्यांनी एकूण 9 विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात त्यांनी घेतलेल्या 5 विकेट्सचा समावेश आहे.

-निवृत्तीनंतर मदनलाल हे भारतीय अ संघाचे प्रशिक्षक बनले. तसेच, सध्या त्यांची बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीमध्ये (CAC) निवड झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---