---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर मोहम्मद शमी

Mohammed Shami
---Advertisement---

संपूर्ण नाव- मोहम्मद शमी अहमद

जन्मतारिख- 3 सप्टेंबर, 1990

जन्मस्थळ- अमरोहा, उत्तर प्रदेश

मुख्य संघ- भारत, बंगाल, दिल्ली डेअरडेविल्स, आयसीसी विश्व एकादश, भारत अ, किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 6 ते 8 नोव्हेंबर, 2013, ठिकाण – कोलकाता

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 6 जानेवारी, 2013, ठिकाण – दिल्ली

आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 31 मार्च, 2014, ठिकाण – ढाका

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 60, धावा- 685, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 60, विकेट्स- 216, सर्वोत्तम कामगिरी- 6/56

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 82, धावा- 184, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 82, विकेट्स- 152, सर्वोत्तम कामगिरी- 5/69

आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-

गोलंदाजी- सामने- 17, विकेट्स- 18, सर्वोत्तम कामगिरी- 3/15

थोडक्यात माहिती-

-मोहम्मद शमीचे वडील तौसिफ अली हे शेतकरी आहेत. ते स्वत: वेगवान गोलंदाज होते. त्याला 3 भाऊ आणि 1 बहीण आहे.-शमीच्या वडिलांनी त्याला वयाच्या 15व्या वर्षी आपल्या गावापासून 22 किमी दूर मोरदाबाद येथे नेले आणि तिथे त्याची प्रशिक्षक बद्रुद्दीन सिद्दीकी यांच्याशी ओळख करून दिली.

-शमीच्या अथक प्रयत्नांनंतरही राजकारणामुळे 19 वर्षांखालील उत्तर प्रदेश संघात त्याची निवड झाली नव्हती.
-प्रशिक्षक सिद्दीकी यांच्या सल्ल्यानुसार शमी 2005मध्ये कोलकाता येथील दालहाऊसी अॅथलॅटिक क्लबमध्ये गेला. तिथे सीएबीचे सहाय्यक सचिव देबब्रता दास हे त्याच्या खेळीने प्रभवित झाले.

-दास यांनी शमीला त्यांच्या स्वत:च्या क्लबमध्ये नेले. त्याला राहायला घर नसल्यामुळे आपल्या घरी शमीला राहायला जागा दिली. तसेच त्याला 75000 रुपयेही दिले. पण शमीने ते घेतले नाही.

-22 वर्षांखालील बंगाल संघात शमीची निवड न झाल्याने दास यांनी त्याला प्रशिक्षक समरबन बॅनर्जींशी भेटवले. बॅनर्जी शमीच्या गोलंदाजीला प्रभावित झाल्याने त्यांनी 22 वर्षांखालील बंगाल संघात पर्याय म्हणून त्याची निवड केली.

-शिवाय दास यांनी शमीला मोहन बगन क्लबमध्ये दाखल केले. तिथे शमीने सौरव गांगुलीला गोलंदाजी केली होती आणि गांगुलीने शमीची विशेष काळजी घेण्यास सांगितले होते.

-शेवटी 2010मध्ये शमीला बंगाल रणजी ट्रॉफी संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. यावेळी आसामविरुद्ध शमीने 3 विकेट्स घेतल्या होत्या.

-2012मध्ये वेस्ट इंडिज अ विरुद्ध शमीने चेतेश्वर पुजारासोबत मिळून 10व्या विकेटसाठी 73 धावांची भागिदारी रचली होती. त्यांच्या या कामगिरीने भारत अ ने तो अनधिकृत कसोटी सामना जिंकला होता.

-2012-13चा रणजी ट्रॉफी हंगाम शमीला चांगला गेला. त्याने हैद्राबादविरुद्ध पहिल्या सामन्यात 2 डावात 4/36 आणि 6/71 अशी कामगिरी केली होती. तर पुढील बंगालविरुद्धच्या सामन्यात त्याने 6 चेंडूत नाबाद 15 धावा केल्या होत्या.

पुढील मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने 2 डावात 7/79 आणि 4/72 अशी कामगिरी केली होती. यात पहिल्या डावातील त्याच्या हॅटट्रीकचा समावेश होता.

-2011मध्ये शमीला आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतले. तर पुढे 2015मध्ये त्याला दिल्ली डेअरडेविल्सने 4.25 कोटींना विकत घेतले.

-2013मध्ये पाकिस्तानविरुद्ध वनडेत पदार्पण 9 षटकात 23 धावा देत शमीने 1 विकेट घेत सर्वांना प्रभवित केले होते.

-2014सालच्या आशिया चषकात अफघानिस्तानविरुद्ध शमीने त्याच्या वनडेतील 50 विकेट्स पूर्ण केल्या. यासह वनडेत सर्वात वेगवान 50 विकेट्स घेणारा तो तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला.

-शमी हा 2015च्या आयसीसी विश्वचषकातील सर्वोत्कृष्ठ खेळांडूंपैकी एक आहे. यावेळी 8 सामने खेळत शमीने 17.29च्या सरासरीने 17 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचा इकोनॉमी रेट हा 4.18 पेक्षाही कमी होता. केवळ उपांत्य फेरित तो एकही विकेट घेऊ शकला नव्हता.

-नोव्हेंबर 2013मध्ये शमीने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. त्कायरन पोलार्डची पहिली विकेट घेतली होती. त्याने संपूर्ण कसोटी मालिकेत 9/118 कामगिरी केली होती. ही कसोटीत वेगवान गोलंदाजाने केलेली सर्वोत्कृष्ठ कामगिरी होती.

-2014च्या इंग्लंडविरु्धच्या कसोटीत शमीने भुवनेश्वर कुमारसोबत 10व्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी रचली होती. ही कसोटीत 10व्या विकेटसाठी करण्यात आलेली दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी होती.

-शमीने क्रिकेटमध्ये शमी अहमद नावाने पदार्पण केले होते. पण, कसोटी पदार्पणानंतर त्याने स्पष्ट केले की, त्याचे नाव मोहम्मद शमी आहे.

-6 जून 2014 रोजी शमीने हसीन जहान हिच्याशी लग्न केले. लग्नानंतर तिचे नाव आयरा शमी ठेवण्यात आले. ते आता वेगळे राहतात.

हेही वाचा-
फक्त खेळ बदलला! भारताकडून पाकिस्तानचा दारून पराभव
वर्ल्डकप 2023 मधून राहुलचा पत्ता कट? ईशानच्या पकिस्तानविरुद्धच्या दमदार खेळीमुळे क्रिकेट विश्वात चर्चा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---