बुधवारी (2 सप्टेंबर) आशिया चषकातील तिसरा सामना भारत-पाकिस्तान संघात खेळला गेला. यात एक भारीतय संघाची फंलदाजी संपल्यानंतर पाऊस सुरू झाला. जवळपास 2 तास सुरू राहिलेल्या पाऊसामुळे हा महासामना रद्द झाला. परंतु, या सामन्यात भारीतय संघाचा यष्टीरक्षक फंलदाज ईशान किशनने सर्वांचे मन जिंकले. केएल राहुलच्या गैरहरीत ईशानला संघात खेळण्यची संधी मिळाली त्याने या संधीच सोन करून दाखवले. आता ईशानची ही खेळी राहुससाठी धोक्याची ठरू शकते अशी चर्चा चालू आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ कठीण परस्थित असताना पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या ईशान किशन (Ishan Kishan) ने 81 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 82 धावांची खेळी केली. 10 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर श्रेयस अय्यरच्या रूपाने भारताने तिसरी विकेट गमावली, त्यानंतर ईशान फलंदाजीसाठी मैदानात होता.
ईशानने खूप समजूतदारपणाने आणि आरामात आपला डाव पुढे नेला. यादरम्यान दुसऱ्या टोकाला उपस्थित असलेला भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) ने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि दोघांनी पाचव्या विकेटवर 138 धावांची भागीदारी केली. आपल्या आक्रमक वृत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या ईशान किशनने हळूहळू आपला डाव पुढे नेत आपण अशा परिस्थितीतही फलंदाजी करू शकतो हे दाखवून दिले. इशानने हे काम पाचव्या क्रमांकावर केले, ज्यासाठी केएल राहुल (KL Rahul) टॉपर मानला जात होता.
आत ईशानच्या या उत्कृष्ट फंलदाजीमुळे राहुलच्या खेळात अडचण निर्माण झाली आहे. पाकिस्तानसारख्या मजबूत गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध चांगला खेळ दाखवून, ईशानने आगामी 2023 मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी यष्टिरक्षक म्हणून दावा केला आहे. केएल राहुलला विश्वचषकासाठी पहिली पसंती यष्टिरक्षक म्हणून ओळखले जात होते. मात्रा, ईशान आता यात पुढे गेला आहे.
विश्वचषकात ईशानची निवड राखीव विकेट म्हणून केली जाण्याची शक्यता असली तरी आता तो केवळ राखीव यष्टिरक्षक म्हणून दिसणार नाही. पाकिस्तानविरुद्ध ईशानची शानदार खेळी निवडकर्त्यांना नक्कीच विचार करायला लावेल. दुसरीकडे, केएल राहुलबद्दल बोलायचे झाले तर तो दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर आहे. अशा स्थितीत त्याच्या लय आणि मॅच फिटनेसवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (ishan kisha will trouble kl rahul in world cup after hi scored 82 runs against pakistan in asia cup 2023
)
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानची सुपर 4मध्ये एन्ट्री, तर भारतानेही उघडलं खातं, Points Tableमध्ये तुमचा आवडता संघ आहे तरी कुठे?
कुठे आणि कसा पाहायचा बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामना?, लगेच जाणून घ्या