संपुर्ण नाव- मोहित महिपाल शर्मा
जन्मतारिख- 18 सप्टेंबर, 1988
जन्मस्थळ- बल्लभगड, हरियाणा
मुख्य संघ- भारत, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, हरियाणा, भारत अ, इंडिया ब्ल्यू, किंग्स इलेव्हन पंजाब आणि दक्षिण विभाग
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 1 ऑगस्ट, 2013, ठिकाण – बुलवायो
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 30 मार्च, 2014, ठिकाण – ढाका
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 26, धावा- 31, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 26, विकेट्स- 31, सर्वोत्तम कामगिरी- 4/22
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 8, धावा- 3, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 8, विकेट्स- 6, सर्वोत्तम कामगिरी- 2/28
थोडक्यात माहिती-
-छोट्या शहरातून येऊन क्रिकेटमध्ये उभरणारा क्रिकेटपटू म्हणजे मोहित शर्मा. तो नवी दिल्लीपासून 37 किमी दूर असणाऱ्या बल्लभगड या शहरातील राहणारा आहे.
-त्याच्या कुंटुंबातील आणि स्थित मित्रांपैकी कोणीही क्रिकेट क्षेत्रात नसल्याने क्रिकेटला गांभीर्याने घेणे मोहितसाठी खूप कठीण होते. तो रस्त्यावरील क्रिकेट आणि स्थानिक टेनिस बॉल टूर्नामेंटद्वारे आपल्याला क्रिकेट कौशल्याला जपत होता.
-महितने भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज विजय यादव यांच्या फरिदाबादमधील क्रिकेट अकादमीत पहिल्यांदा व्यवस्थित प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती.
-2008मध्ये मोहितला अकादमीत क्रिकेटदरम्यान झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे त्याने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी 1 वर्ष लागले होते. मात्र, विजय यादव यांनी त्याला प्रोत्याहन दिल्याने तो परत क्रिकेटकडे वळला.
-मोहित हरियाणा क्रिकेट असोसिएशनद्वारे आयोजित वयोगटातील कॅम्पमध्ये उत्कृष्ठ खेळी करत असायचा. त्याच्या या प्रदर्शनाने त्याला 2011मध्ये गुजरातविरुद्ध रणजी ट्रॉफीत संधी मिळाली. यावेळी हरियाणाकडून त्याने संपूर्ण हंगामात अवघे 3 सामने खेळले होते.
-2012-13च्या रणजी ट्रॉफी हंगामात मोहित सर्वाधिक विकेट्स घेणारा 5वा गोलंदाज ठरला. या हंगामात एकूण 7 सामने खेळत 23च्या सरासरीने मोहितने 37 विकेट्स घेतल्या होत्या.
-2013मध्ये मोहित आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्स फ्रंचायझीचा भाग होता. यावेळी 15 सामने खेळत त्याने 23 विकेट्स घेतल्या होत्या.
-एवढेच नाही तर, 2013मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध मोहितने वनडे पदार्पण केले होते. यावेळी पदार्पणाच्या सामन्यातच 10-3-26-2 अशी आकडेवारी करत तो सामनावीर ठरला. यासह मोहित संदिप पाटीलनंतर अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला.
-ऑक्टोबर 2013मध्ये लाहलीतील सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या प्रथम श्रेणी सामन्यात मोहितने त्याला 5 धावांवर बाद केले होते. यासह सचिनला प्रथम श्रेणीत बाद करणारा तो शेवटचा गोलंदाज ठरला.
-इशांत शर्माला 2015च्या विश्वचषकापुर्वी झालेल्या दुखापतीने मोहितला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडविरुद्ध विश्वचषकात खेळण्याची संधी मिळवून दिली होती. यावेळी मोहितने 8 सामने खेळत 24.15च्या सरासरीने 13 विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या.
-मोहित दक्षिण आफ्रिकाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला आपला क्रिकेट आदर्श मानतो.
-मोहित त्याच्या मर्यादित षटकांच्या सामन्यातील यशाचे श्रेय एमएस धोनीला देतो. धोनीने त्याला घडवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला, असे मोहितचे म्हणणे आहे. तसेच सीएसकेचे प्रशिक्षक अँडी बिचेल यांचाही वाटा असल्याचे ते मानतो.
-एवढे यश मिळवूनही मोहित त्याच्या कुटुंबासोबत बल्लभगडमधील त्याच्या घरी राहतो.