संपुर्ण नाव- मुरली विजय
जन्मतारिख- 1 एप्रिल, 1984
जन्मस्थळ- चेन्नई
मुख्य संघ- भारत, चेन्नई सुपर किंग्स, केमप्लास्ट, दिल्ली डेअरडेविल्स, इसेक्स, भारत अ, भारत ब, इंडिया ग्रीन, इंडिया ब्ल्यू, इंडिया रेड, किंग्स इलेव्हन पंजाब, लायका कोवाी किंग्स, शेष भारतीय संघ, रुबी ट्रिकी वॉरियर्स, सोमरसेट, तमिळनाडू आणि तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन एकादश
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 6 ते 10 नोव्हेंबर, 2008, ठिकाण – नागपूर
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 27 फेब्रुवारी, 2010, ठिकाण – अहमदाबाद
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध अफगानिस्तान, तारिख – 1 मे, 2010, ठिकाण – ग्रॉस आयलेट
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 61, धावा- 3982, शतके- 12
गोलंदाजी- सामने- 61, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/12
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 17, धावा- 339, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 17, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/19
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 9, धावा- 169, शतके- 0
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती – तारिख 30 जानेवारी, 2023
थोडक्यात माहिती-
-मुरली विजय (Murali Vijay) याच्या घरातील सर्व व्यक्ती अभ्यासाच्या बाबतीत खूप गंभीर होते. त्याची बहीणही अभ्यासात हुशार होती. तिला बोर्डाच्या परिक्षेत 97-98 टक्के गुण होते. तर, मुरलीला 40 टक्केच गुण होते. तो बारावीत नापास झाला.
-बारावीत अनुत्तीर्ण झाल्याने त्याच्या वडिलांनी तो शिपाई होण्याचा लायक आहे असे म्हटले होते. यामुळे त्याने वयाच्या 17व्या वर्षी घर सोडले.
-पैसे कमावण्यासाठी मुरलीने त्याच्या मित्रांच्या मदतीने स्नुकर पार्लरमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. तिथेच तो कसरत करत क्रिकेटचा थोडा फार सराव करत असत.
-त्याने नंतर साखळीचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. या सर्व घटनांमुळे तो मजबूत झाला आणि स्वावलंबी होऊन जगायला शिकला.
-पुढे मुरलीने चेन्नईतील विवेकानंद महाविद्यालय मैलापूर येथून आपली 12वी पूर्ण केली. त्या महाविद्यालयात क्रिकेटलाही प्रोत्साहन दिले जात असल्याने, मुरलीने क्रिकेटकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.
-वयाच्या 21व्या वर्षी मुरलीची लांब केसामुळे तमिळनाडू संघात निवड झाली नव्हती. लगेच सायंकाळी त्याने त्याचे केस कापले होते.
-भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक आणि तमिळनाडू क्रिकेटमधील प्रसिद्ध व्यक्ती भारत अरूण यांनी मुरलीमधील गोलंदाजी कौशल्याला हेरले आणि त्याला चेन्नई क्रिकेट लीगमधील केमप्लास्ट संघाकडून खेळण्यास सांगितले.
-मुरलीच्या शांत स्वभावामुळे त्याला मॉन्क हे टोपणनाव देण्यात आले.
-प्रथम श्रेणी कारकिर्दीच्या (2006) सुरुवातीच्या काळात मुरलीने तमिळनाडू संघाकडून मोठ्या आकडी धावा केल्या.त्याने एका रणजी ट्रॉफीच्या सामन्यात अभिनव मुकुंद बरोबर 462 धावांची भागीदारी केली. ज्यामुळे त्याला 2008मध्ये भारताच्या कसोटी संघात स्थान मिळाले.
-2008-09 ला गौतम गंभीरला एका सामन्यासाठी निलंबीत करण्यात आल्याने मुरलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण केले. यावेळी त्याने प्रत्येक डावात 33 आणि 41 धावा केल्या होत्या. भारताने ती कसोटी मालिका 2-0ने जिंकली होती.
-2012-13मध्ये मुरलीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळाली होती. यावेळी त्याने 150 धावा करत सर्वांना प्रभाविकत केले होते.
-तर, 2014-15च्या ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत तो सलामीवीर फलंदाज होता. यावेळी विराट कोहलीनंतर भारतीय संघातील सर्वाधिक धावा कराणारा तो दुसरा फलंदाज होता. मात्र त्याला 2015च्या विश्वचषकात संघात स्थान मिळाले नाही.
-कसोटीत मुरलीने 61 सामन्यात 38.28 च्या सरासरीने 3982 धावा केल्या होत्या. यात त्याच्या 12 शतकांचा आणि 15 अर्धशतकांचा समावेश होता. यात त्याच्या हैद्राबादमधील ऑस्ट्रेलियाविरुदधच्या कसोटीतील सर्वोत्कृष्ट 167 धावांचा समावेश होता. भारताने ती कसोटी मालिका एका डावाच्या आघाडीवर आणि 135 धावांनी जिंकली होती.
-मुरलीला वनडे संघात कायमचे स्थान मिळाले नाही. त्याने 17 वनडे सामन्यात 21.18च्या सरासरीने 339 धावा केल्या होत्या. यात त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश होता. हरारेमधील झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात त्याने वनडेतील सर्वाधिक 72 धावा केल्या होत्या.
-मुरलीला 9 टी20 सामने खेळण्याची संधी मिळाली. यावेळी त्याने 18.77च्या सरासरीने 169 धावा केल्या. यात त्याच्या अफगानिस्तानविरुद्धच्या सर्वाधिक 48 धावांचा समावेश होता.
-दिनेश कार्तिकची पत्नी निकिता आणि मुरलीत प्रेमसंबंध असल्याचे कळल्यानंतर कार्तिकने निकिताला घटस्फोट दिला आणि पुढे मुरली आणि निकिताने 2012मध्ये लग्न केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: मुरली विजयचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, देशांतर्गत क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा
मिलर ठरला इंग्लंडसाठी ‘किलर’! 343 धावांचा पाठलाग करत वनडे मालिका दक्षिण आफ्रिकेच्या खिशात