संपुर्ण नाव- नवज्योत सिंग सिद्धू
जन्मतारिख- 20 ऑक्टोबर, 1963
जन्मस्थळ- पटियाला, पंजाब
मुख्य संघ- भारत आणि पंजाब
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 12 ते 16 नोव्हेंबर, 1983
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 9 ऑक्टोबर, 1987
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 51, धावा- 3202, शतके- 9
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 136, धावा- 4413, शतके- 6
थोडक्यात माहिती-
-नवज्योत सिंग सिद्धू यांचे वडील भागवत सिंग हे भारताचे माजी क्रिकेटपटू होते. त्यांची इच्छा होती की त्यांच्या मुलानेही क्रिकेट खेळावे. त्यामुळे नवज्योत सिंग सिद्धू हे क्रिकेट क्षेत्राकडे वळले.
-नवज्योत यांचे वडील त्यांना शेरी या नावाने बोलवत असत. त्यांच्या फलंदाजी शैलीवरून त्यांना सिक्सर सिंधू आणि क्षेत्ररक्षणावरून जॉन्टी सिंधू अशी टोपणनावे देण्यात आली होती.
-सिंधू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू या आहेत. सिद्धू यांचे आणि त्यांच्या पत्नीचे नाव सारखेच आहे. त्या पंजाब आरोग्य विभागात डॉक्टर होत्या. मात्र त्यांनी 2012 साली राजकारणात जाण्यासाठी डॉक्टरचे काम सोडले.
-त्यांना करण (मुलगा) आणि रबिया (मुलगी) अशी 2 मुले आहेत.
-विशेष म्हणजे जास्तीत जास्त पंजाबी लोकांना चिकन खायला खूप आवडते. पण, सिद्धू हे शुद्ध शाकाहारी आहेत.
-सिद्धू यांनी वनडे कारकिर्दीतील पहिले शतक 1989 साली पाकिस्तानविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत मारले होते. क्रिस श्रीकांत यांच्यासह सलामीला फलंदाजी करत आणि पुढे मोहिंदर यांच्यासह मिळून त्यांनी 108 धावांची भागिदारी केली होती. यासाठी त्यांना सलामीवीर पुरस्कारही मिळाला होता.
-51 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत सिद्धू यांनी अवघे एक द्विशतक केले होते आणि तेही खूप हळूवार केले होते. तेव्हापर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेले ते 5वे हळूवार शतक होते.
-एप्रिल 1996ला शारजा येथे पाकिस्तानविरुद्ध शतक करत सिद्धू हे वनडेत 500हून अधिक धावा करणारे पहिलेच भारतीय फलंदाज ठरले होते.
-क्रिकेटमधील निवृत्तीनंतर सिद्धू यांनी राजकारणात प्रवेश केला. 2004 साली त्यांची भारतीय जनता पार्टीतून अमृतसरच्या खासदारदी निवड झाली होती. पुढे काही कारणास्तव त्यांना या पदावरून राजीनामा द्यावा लागला. 2016 साली ते पुन्हा खासदार झाले पण 3 महिन्यात त्यांनी राजीनामा दिला.
-सिद्धू हे त्यांच्या एक ओळी कोटसाठी प्रसिद्ध आहेत. ज्यांना सिद्धूवाद असे म्हणतात.
-त्यांनी निंबूस, टेन स्पोर्ट्स आणि इएसपीएन स्टार स्पोर्ट्ससाठी काम केले आहे. ते आताही वेगवेगळ्या न्यूझ चॅनल्सवरती क्रिकेट विश्लेषकाचे काम करतात.
-शिवाय ते ग्रेट इंडियन लॉफ्टर चॅलेंज या टिव्ही प्रोग्रामवरती जज आहेत. तसेच कॉमेडी नाईट्स विथ कपिल आणि बिग बॉस 6 मध्येही ते आहेत.
-एवढेच नव्हे तर, त्यांनी मुझसे शादी करोगी यातही विशेष पाहुण्यांचे काम केले आहे. तसेच, मेरा पिंड या पंजाबी सिनेमात त्यांनी अभिनयही केला आहे. एबीसीडी2 मध्ये त्यांनी आणि कपिल शर्मा यांनी कॉमेडी गेस्टचे काम केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
HBD विरू: तो आला..त्याने पाहिलं..अन् त्याने जिंकलं! भारतीय क्रिकेटचा खराखुरा ‘सुलतान’
खूप होत आहे टीका, पण सुरेश रैना म्हणतोय, “त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्याच”