संपुर्ण नाव- निखील चोप्रा
जन्मतारिख- 26 डिसेंबर, 1973
जन्मस्थळ- अलाहाबाद, उत्तर प्रदेश
मुख्य संघ- भारत, दिल्ली आणि उत्तर प्रदेश
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 2 ते 6 मार्च, 2000
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध केन्या, तारिख – 28 मे, 1998
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 7, शतके- 0
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 39, धावा- 310, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 39, विकेट्स- 46, सर्वोत्तम कामगिरी- 5/21
थोडक्यात माहिती-
-निखील चोप्रा याने भारताकडून अवघा एक कसोटी सामना खेळला होता. 2000साली दक्षिण आफ्रिकाविरुद्ध त्याने कसोटीत पदार्पण केले होते. यावेळी त्याला फक्त 7 धावा करता आल्या.
-वनडेत 25पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या तुलनेत चोप्राची गोलंदाजी सरासरी (27.95) तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्कृष्ट सरासरी होती. वनडेत त्याने एकूण 46 विकेट्स घेतल्या होत्या.
-त्याने टोरंटोतील वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडेत 5/21 इतकी सर्वोत्तम कामगिरी केली होती. तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सिंगापूरमधील सामन्यात 60 चेंडूत 3 षटकारांसह त्याने 61 धावा केल्या होत्या.
-वनडेत अवघ्या 26 डावात 310 विकेट्स करण्याचा त्याने पराक्रम केला होता.
-एवढेच नाही तर, दुलीप ट्रॉफीत मध्य विभागाविरुद्ध चोप्राने नाबाद 132 धावांची खेळी केली होती. यात 5 षटकांरांचा समावेश होता.
-भारतीय संघात हरभजन सिंग आणि सरनदिप सिंग हे फिरकीपटू असल्याने चोप्राला जास्त संधी मिळाली. म्हणून त्याला लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली. त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द अवघ्या 2 वर्षांची होती.
-क्रिकेटमधील निवृत्तीनंतर तो दूरदर्शनवरील क्रिकेट विश्लेषक बनला. तो क्रिकेट क्रेजी, टाईम आउट आणि क्रिक एक्स्ट्रा या एसएसपीएनवरील कार्यक्रमांत सातत्याने येणारा पाहुणा आहे.
-आता चोप्रा आज तक आणि इंडिया टुडे या न्यूज चॅनलवरती क्रिकेट तज्ञाचे काम करतो.