संपुर्ण नाव- प्रग्यान प्रयाश ओझा
जन्मतारिख- 5 सप्टेंबर, 1986
जन्मस्थळ- भुवनेश्वर, ओडिसा
मुख्य संघ- भारत, बिहार, डेक्कन चार्जर्स, हैद्राबाद, भारत अ, इंडिया रेड, 19 वर्षांखालील भारतीय संघ, मुंबई इंडियन्स, सुरी आणि दक्षिण विभाग
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 24 ते 27 नोव्हेंबर, 2009, ठिकाण – कानपूर
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध बांग्लादेश, तारिख – 28 जून, 2008, ठिकाण – कराची
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध बांग्लादेश, तारिख – 6 जून, 2009, ठिकाण – नॉटिंगहम
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 24, धावा- 89, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 24, विकेट्स- 113, सर्वोत्तम कामगिरी- 6/47
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 18, धावा- 46, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 18, विकेट्स- 21, सर्वोत्तम कामगिरी- 4/38
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 6, धावा- 10, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 6, विकेट्स- 10, सर्वोत्तम कामगिरी- 4/21
थोडक्यात माहिती-
-प्रग्यान ओझा जरी ओडिसामधील असला तरी तो हैद्राबादकडून जास्त क्रिकेट खेळला आहे.
-ओझा डाव्या हाताचा फिरकीपटू वेंकटपथी राजू यांना खेळताना बघून मोठा झाला आहे. त्याने वयोगटातील क्रिकेट आणि 2005 सालचे 19 वर्षांखालील 2 सामने हैद्राबादकडून खेळले आहेत.
-ओझाला 2008साली आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. 2010च्या संपूर्ण हंगामात सर्वाधिक विकेट्स घेत त्याला पर्पल कॅप मिळाली होती. तो 2014मध्ये 89 विकेट्स घेत आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत 7व्या क्रमांकावर पोहोचला.
-क्रिकेटच्या कोणत्याही स्वरूपात पदार्पणाच्या सामन्यातच सामनावीर पुरस्कार मिळणाऱ्या खूप कमी क्रिकेटपटूंपैकी ओझा हा एक आहे. टी20 पदार्पणाचा आयसीसी टी20 विश्वचषक 2009मध्ये त्याने बांग्लादेशविरुद्ध एका डावात 4 विकेट्स घेत सामनावीर पुरस्कार मिळवला. त्याच्याशिवाय फक्त दिनेश कार्तिक आणि सुब्रमन्यम बद्रीनाथ यांना पदार्पणाच्या टी20 सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळाला आहे.
-2009मध्ये ओझाने श्रीलंकाविरुद्ध त्याचे कसोटी पदार्पण केले. यावेळी प्रथम फलंदाजी करत भारताने 642 धावा केल्या होत्या. यावेळी श्रीलंकाचा क्रिकेटपटू तिलकदर्शने दिलशान याचा पहिल्याच चेंडूवर झेल पकडला होता.
-2010मध्ये ओझाने करबी बराल हिच्याशी लग्न केले. खूप कमी क्रिकेटपटूंच्या पत्नी या अधिक शिकलेल्या आहेत. त्याच्या पत्नीने जीवरसायनशास्त्रमध्ये पीएचडी केली आहे.
-श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन याने 2010मध्ये कसोटीत ओझाची विकेट घेत आपल्या कसोटीतील 800 विकेट्स पूर्ण केल्या होत्या.
-2011मध्ये ओझाची काउंटी क्रिकेटमधील सुरी संघात निवड झाली होती. यावेळी 4 सामने खेळत त्याने 12.95च्या सरासरीने 24 विकेट्स घेतल्या होत्या.
-2014मध्ये हैद्राबादमधील प्राण्यांच्या नैतिक उपचारांसाठी काम करणाऱ्या लोकांच्या (PETA) कॅम्पेनमध्ये सहभाग नोंदवला होता.
-ओझाने त्याच्या कारकिर्दीतील 24 कसोटी सामन्यांपैकी 4 कसोटी सामने बांग्लादेश आणि श्रीलंकामध्ये खेळले आहेत. म्हणजेच त्याने भारतीय उपखंडाबाहेर बरेच कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्यानंतर रविश्चंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजाने कसोटीत पदार्पण करूनही त्यांनी भारतीय उपखंडाबाहेर खूप कमी कसोटी सामने खेळले आहेत.
-ओझाने कसोटीतील त्याच्या एका डावातील 10 विकेट्स या आपल्या आणि सचिन तेंडूलकरच्या शेवटच्या कसोटी सामन्यात घेतल्या होत्या. नोव्हेंबर 2013मध्ये मुंबईत वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत त्याने हा कारनामा केला होता.
-ओझाने 2020मध्ये क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्ती घेतली.