संपुर्ण नाव- राहूल लक्ष्मण सांघवी
जन्मतारिख- 3 सप्टेंबर, 1974
जन्मस्थळ- सुरत, गुजरात
मुख्य संघ- भारत, दिल्ली आणि रेल्वे
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 27 फेब्रुवारी ते 1 मार्च, 2001
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 18 जानेवारी, 1998
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 2, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 1, विकेट्स- 2, सर्वोत्तम कामगिरी- 2/67
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 10, धावा- 8, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 10, विकेट्स- 10, सर्वोत्तम कामगिरी- 3/29
थोडक्यात माहिती-
-राहूल सांगवी हा पारंगत फिरकीपटू होता. विशेषत खूप तुरळक पहायला मिळणारी ऑरथोडॉक्स स्पिन गोलंदाजी तो करत होता.
-सांगवीला भारताचे माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे प्रशिक्षण लाभले होते.
-त्याने अ दर्जाच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाकडून खेळताना विश्वविक्रम नोंदवला आहे. 1997-98मध्ये हिमाचल प्रदेशविरुद्ध त्याने 15 धावा देत 8 विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम केला होता. त्याचा हा विक्रम आजही अबाधित आहे.
-सांगवीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1998च्या तिरंगी मालिकेत केली होती. यावेळी झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याने 8 षटकात 29 धावा देत 3 विकेट्स घेण्याचा कारनामा त्याने केला होता. ही त्याची वनडेतील सर्वोत्तम कामगिरी होती.
-एवढे कौशल्य असूनही सांगवीला भारताकडून फक्त 10 वनडे खेळता आले. 1998मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने वनडे पदार्पण केले. तर, त्याच वर्षात झिम्बाब्वेविरुद्ध त्याच्या वनडे कारकिर्दीचा अंत झाला.
-वनडेनंतर त्याने दिल्ली आणि उत्तर विभागाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. यामुळे त्याला 2001ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत खेळण्याची संधी मिळाली.
-2001 सालचा ऑस्ट्रेलियविरुद्धचा कसोटी सामना हा त्यांचा एकमेव कसोटी सामना ठरला. यात त्याने 2 विकेट्स घेतल्या आणि 2 धावा केल्या.
-सांगवी आता आयपीएच्या मुंबई इंडियन्स संघाचा व्यवस्थापक आहे.