संपुर्ण नाव- रमेश राजाराम पोवार
जन्मतारिख- 20 मे, 1978
जन्मस्थळ- बॉम्बे (आताची मुंबई), महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत, इंडिया ब्ल्यू, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, किंग्स इलेव्हन पंजाब, कोची टस्कर्स केरळ, मुंबई, राजस्थान क्रिकेट असोसिएशन अध्यक्षयी एकादश, रिबोक एकादश
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध बांग्लादेश, तारिख – 18 ते 22 मे, 2007
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 16 मार्च, 2004
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 2, धावा- 13, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 2, विकेट्स- 6, सर्वोत्तम कामगिरी- 3/33
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 31, धावा- 163, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 31, विकेट्स- 34, सर्वोत्तम कामगिरी- 3/24
थोडक्यात माहिती-
-रमेश पवार हे 5 फूट 5 इंच उंचीचे उजव्या हाताचे माजी फिरकीपटू आहेत. त्यांचा भाऊ किरण पोवार हे आता 19 वर्षांखालील विदर्भ क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहेत.
-शरिराने जाड पण तंदुरुस्त अशा पवार यांना 2000 साली बंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत निवड झाली होती.
-पोवार यांनी त्यांच्या देशांतर्गत क्रिकेटची सुरुवात मुंबई संघाकडून केली. 2002-03च्या रणजी ट्रॉफी विजयात त्यांचा वाटा मोलाचा होता.
-सप्टेंबर 2003च्या इराणी ट्रॉफीत शेष भारतीय संघासारख्या मजबूत संघाविरुद्ध खेळताना पोवार यांनी 61 धावा देत 4 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. त्यांच्या विकेटमध्ये राहूल द्रविड, युवराज सिंग आणि सौरव गांगुलींसारख्या मोठ्या क्रिकेटपटूंच्या समावेश होता.
-देशांतर्गत क्रिकेटमधील त्यांच्या कामगिरीने त्यांना 2004च्या ऐतिहासिक पाकिस्तान दौऱ्यावर खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, यावेळी त्यांनी 6 षटके गोलंदाजी करत 35 धावा देत एकही विकेट घेतली नव्हती.
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह पवार यांनी त्यांची देशांंतर्गत क्रिकेटमधील कामगिरीही चालू ठेवली. 2005-06मध्ये रणजी ट्रॉफीत पुनरागमन करत त्यांनी संपूर्ण हंगामात 63 विकेट्स घेतल्या होत्या. रणजी ट्रॉफीच्या एका हंगामात 50पेक्षा जास्त विकेट्स घेण्याची ही त्यांची दुसरी वेळ होती.
-आयपीएलच्या पहिल्या हंगामात रमेश यांची किंग्स इलेव्हन पंजाब संघात निवड झाली होती. यावेळी पहिल्या सामन्याच्या पहिल्या षटकात विकेट घेण्याचा पराक्रम पवारांनी केला होता. त्यांनी पंजाबकडून 3 हंगाम घालवले आणि पुढे 2011मध्ये ते अनधिकृत कोची टस्कर्स केरळ संघात सामाविष्ट झाले. पुढे परत 2012ला त्यांनी पंजाबकडून आयपीएलचा हंगाम खेळला होता.
-प्रथम श्रेणीचे 14 हंगाम मुंबई संघाकडून घालवल्यानंतर पवारांनी 2013ला राजस्थान संघात प्रवेश केला. यावेळी 6 सामन्याचत त्यांनी 10 विकेट्स मिळवल्या होत्या.
-2014साली त्यांची राजस्थान क्रिकेट असोसिएशनमध्ये निवड झाली होती.
-नोव्हेंबर 2015मध्ये क्रिकेट सर्व स्वरूपातून निवृत्ती घेतली.
-2018च्या महिला विश्वचषकात पोवार यांचा मिताली राजशी वाद झाला होता. त्याचा परिणाम असा झाला की तिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत संघाबाहेर ठेवण्यात आले होते.