fbpx
ADVERTISEMENT

मराठीत माहिती- क्रिकेटर संजय बांगर


संपुर्ण नाव- संजय बापूसाहेब बांगर

जन्मतारिख- 11 ऑक्टोबर, 1972

जन्मस्थळ- बीड, महाराष्ट्र

मुख्य संघ- भारत, डेक्कन चार्जर्स, कोलकात नाईट रायडर्स आणि रेल्वे

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (वेगवान)

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 3 ते 6 डिसेंबर, 2001

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 25 जानेवारी, 2001

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 12, धावा- 470, शतके- 1

गोलंदाजी- सामने- 12, विकेट्स- 7, सर्वोत्तम कामगिरी- 2/23

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 15, धावा- 180, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 15, विकेट्स- 7, सर्वोत्तम कामगिरी- 2/39

थोडक्यात माहिती-

-संजय बांगर यांचा जन्म बीडवरून 25-30 किमी दूर अंतरावर असणाऱ्या एका गावात झाला. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण हे औरंगाबाद येथे घेतले. तर, क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी त्यांना मुंबई येथे रहावे लागले.

-शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बांगर यांची मुंबई आणि औरंगाबाद येथे शेती आहे.

-बांगर यांनी 1983 साली पहिल्यांदा शेजारांच्या टिव्हीवरती क्रिकेटचा सामना पाहिला होता. यावेळी 1983च्या विश्वचषकातील कपिल देव आणि सुनिल गावस्कर यांच्या खेळीने ते प्रेरित होऊन, क्रिकेटकडे वळले होते.

-औरंगाबाद येथे बांगर यांनी वयाच्या 15व्या वर्षी 15 वर्षांखालील महाराष्ट्र संघाकडून पहिला क्रिकेटचा सामना खेळला होता. त्यानंतर पुढे ते मुंबई येथे प्रशिक्षणासाठी स्थित झाले.

-त्यावेळी मुंबई संघात सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी असे खेळाडू असल्याने त्यांना मुंबईकडून क्रिकेट खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. त्यामुळे बागर हे रेल्वे संघात सामाविष्ट झाले.
 -1993 साली रेल्वेकडून प्रथम श्रेणीचा पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या बांगर यांना संपूर्ण हंगामात केवळ एका डावातच गोलंदाजीचा संधी मिळाली होती. यावेळी त्यांना एकही विकेट घेता आली नव्हती.
– मात्र ते रेल्वेकडून खेळताना 2 रणजी ट्रॉफी आणि 2 इराणी आणि 1 वनडे सामना अश्या 5 चॅम्पियनशिप जिंकल्या होत्या.
-देशांतर्गत क्रिकेटमध्ये बांगर यांनी एकूण 8 हंगाम क्रिकेट खेळले. 2001-02ला इंग्लंडविरुद्ध बोर्ड अध्यक्षयी एकादश संघात त्यांची निवड झाली होती. यावेळी त्यांनी दुसऱ्या डावातील 5 विकेट्सह संपूर्ण सामन्यात 7 विकेट्स घेतल्या होत्या.
– 2001 साली मोहाली येथील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून बांगर यांनी कसोटीत पदार्पण केले होते. त्याच सामन्यातून तिनू योहान्नन आणि इक्बाल सिद्दीकी यांनीही पदार्पण केले होते. हा सामना भारताने 10 विकेट्सने जिंकला असला तरी बांगर यांना यात एकही विकेट मिळवता आली नव्हती.
-तर, बांगर यांनी त्यांच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातच 7व्या क्रमांकावर फलंदाजी करत शतक ठोकले होते. त्यांच्यापुर्वी शिव सुंदर दास (105) आणि सचिन तेंडूलकर (176) यांनीही शतकीय खेळी केली होती.
-2002चा इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका बांगर यांच्यासाठी महत्त्वाची ठरली. या मालिकेतच द्रविड-तेंडूलकर-गांगुली या जोडीने शतकी खेळी केल्या होत्या. यावेळीच सलामीला फलंदाजी करताना बांगर यांनी 68 धावा केल्या होत्या. तर, इंग्लंडच्या 2 महत्त्वपूर्ण गोलंदाजांच्या विकेट घेतल्या होत्या. 
-बांगर यांनी खेळलेल्या 12 कसोटींपैकी भारताने 10 कसोटी जिंकल्या होत्या. केवळ न्यूझालंडविरुद्धच्या त्यांच्या कारकिर्दीतील 2 शेवटचे कसोटी सामने तेवढे भारताने गमावले होते.
-बांगर यांची वनडे कारकिर्द जास्त चांगली नव्हती. वनडे कारकिर्दीत 15 सामने खेळत त्यांनी अवघ्या 180 धावा आणि 7 विकेट्स घेतल्या होत्या.

-त्यांची देशांतर्गत कारकिर्दीतील कामगिरी चमकदार होती. 165 प्रथम श्रेणी सामन्यात बंगर यांनी 8349 धावा आणि 300 विकेट्स घेतल्या होत्या.

-विजय हजारे यांच्यानंतर रणजी ट्रॉफीत 6000च्या दुप्पट धावा आणि 200पेक्षा जास्त विकेट घेणारे ते दुसरेच क्रिकेटपटू आहेत.

-बांगर यांनी डेक्कन चार्जर्स, कोलकाता नाईट राईडर्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबकडून आयपीएल खेळले होते.

-क्रिकेटमधील निवृत्तीनंतर त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे सहकारी प्रशिक्षकपद सांभाळले. पुढे ते संघाचे फलंदाजी प्रशिक्षक बनले.


Related Posts

Next Post
ADVERTISEMENT