संपुर्ण नाव- राशिद गुलाम मोहम्मद पटेल
जन्मतारिख- 1 जून, 1964
जन्मस्थळ- साबरकांठा, गुजरात
मुख्य संघ- भारत आणि बडोदा
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज (वेगवान)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख -24 ते 29 नोव्हेंबर, 1988
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 17 डिसेंबर, 1988
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 0, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 1, विकेट्स- 0, सर्वोत्तम कामगिरी- 0/00
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 0, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 1, विकेट्स- 0, सर्वोत्तम कामगिरी- 0/00
थोडक्यात माहिती-
-राशिद पटेल हे एकमेव असे क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ 1 कसोटी आणि 1 वनडे सामना खेळला आणि एकही धाव आणि विकेटही घेतली नाही.
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांची कामगिरी खराब जरी असली, तरी त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगले गोलंदाजी प्रदर्शन केले होते. प्रथम श्रेणीत 42 सामने खेळत पटेल यांनी 113 विकेट्स घेतल्या होत्या.
-प्रथम श्रेणीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी त्यांनी 1996-97 साली बॉम्बेविरुद्ध खेळताना केली होती. यावेळी त्यांनी 93 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.
-पटेल हे विशेषत: त्यांच्या दुलिप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील नकोश्या कामगिरीसाठी ओळखले जातात. त्यांनी विरुद्ध संघातील रमन लांबा यांना बाद करण्याच्या प्रयत्नात ओवरस्टेपने नो बॉल टाकला. जो फुल टॉस गेला. नंतर ते चक्क स्टंप घेऊन लांबा यांच्या मागे धावले आणि लांबा यांनी बॅटने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. दोघांच्या या वागणुकीमुळे पटेल यांना 13 महिने तर लांबा यांना 10 महिन्यांसाठी निलंबित केले गेले होते.
-बंदीच्या काळादरम्यान पटेल यांनी ब्रॅडफोर्ड लीगमध्ये क्रिकेट खेळले होते. यावेळी त्यांना दुखापतीलाही सामेरे जावे लागले होते.
-पटेल यांचा मुलगा जाफिर राशिद पटेल यांनी इंग्लंड येथे प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. शिवाय त्याची आयपीएलमधील दिल्ली डेअरडेविल्स संघासाठी निवड झाली होती. पण, त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.