संपुर्ण नाव- रविचंद्रन अश्विन
जन्मतारिख- 17 सप्टेंबर, 1986
जन्मस्थळ- मद्रास (आताची चेन्नई), तमिळनाडू
मुख्य संघ- भारत, चेन्नई सुपर किंग्स, दिंडीगल ड्रॅगन्स, भारत अ, इंडिया सिंमन्ट, इंडिया इमर्जिंग प्लेयर्स, इंडिया ग्रीन, इंडिया रेड, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, किंग्स इलेव्हन पंजाब, शेष भारतीय संघ, राइजिंग पुणे सुपरजायंट्स, दक्षिण विभाग, तमिळनाडू, तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन अध्यक्षयी एकादश आणि वोर्सेस्टरशायर
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 6 ते 9 नोव्हेंबर, 2011, ठिकाण – दिल्ली
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 5 जून, 2010, ठिकाण – हरारे
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 12 जून, 2010, ठिकाण – हरारे
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 71, धावा- 2389, शतके- 4
गोलंदाजी- सामने- 71, विकेट्स- 365, सर्वोत्तम कामगिरी- 7/59
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 111, धावा- 675, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 111, विकेट्स- 150, सर्वोत्तम कामगिरी- 4/25
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 46, धावा- 123, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 46, विकेट्स- 52, सर्वोत्तम कामगिरी- 4/8
थोडक्यात माहिती-
-रविचंद्रन अश्विन यातील रविचंद्रन हे त्याच्या वडिलांचे नाव आहे आणि अश्विन हे त्याचे नाव आहे. त्याला आर अश्विन म्हणून ओळखले जाते.
-अश्विनला लहानपणी फुटबॉलची आवड होती. त्याच्य उंचीमुळे तो चेंडूला जोरदार किक मारू शकायचा.
-अश्विन हा दक्षिण रेल्वेत काम करत असताना एग्मोर एक्सेल्सियर्स क्रिकेट क्लबकडून अश्विनने दशकापेक्षा जास्त क्रिकेट खेळले आहे.
-अश्विनची आई चित्रा ह्या अभ्यासाबाबत खूप कडक होत्या. तरीही त्याच्या पालकांनी त्याला क्रिकेट कारकिर्द घडवण्यास मदत केली.
-वयाच्या 14व्या वर्षी क्रिकेट खेळत असताना अश्विनला गंभीर दुखापत झाली होती. त्याची दुखापत इतकी गंभीर होती की त्याला त्यातून सावरण्यासाठी 8 महिने लागले होते. दुखापतीतून क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर अश्विनचे संघातील सलामीवीर फलंदाजाचे स्थान दुसऱ्याला देण्यात आल्याने त्याच्या आईने त्याला गोलंदाजीकडे लक्ष देण्यास प्रोत्साहित केले.
-अश्विननेच्या टी20 पदार्पणाच्या सामन्यातून विराट कोहली आणि नमन ओझाने पार्पण केले होते. वनडे पदार्पणाच्या सामन्यातून ओझा आणि पंकज सुतार तर, कसोटी पदार्पणाच्या सामन्यातून उमेश यावने पदार्पण केले होते.
-2010मध्ये झिम्बाब्वेविरुद्दच्या टी20 पदार्पणाच्या सामन्यात अश्विनने 22 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. तो सामना भारताने 6 विकेट्सने जिंकला होता.
-2010मध्ये श्रीलंकाविरुद्ध अश्विनने वनडे पदार्पण केले होते. यावेळी त्याने 38 चेंडूत 32 धावा तर 10 षटकात 50 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. तो सामना भारत पराभूत झाला होता.
-2011मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण करत अश्विनने 128 धावा देत 9 विकेट्स घेतल्या होत्या. यासह नरेंद्र हिरवानीनंतर कसोटी पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. हिरवानी यांनी कसोटी पदार्पणावेळी 16 विकेट्स घेतल्या होत्या.
-शिवाय शिखर धवन आणि रोहित शर्मानंतर कसोटी पदार्पणाच्या सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकणारा तो तिसरा भारतीय क्रिकेटपटू होता.
-अश्विनच्या नावावर कसोटीत सर्वात जलद 50, 100 आणि 150 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. त्याने त्याच्या 9व्या कसोटीत 50वी विकेट घेतली होती. तर 18व्या कसोटी सामन्यात 100वी आणि 29व्या सामन्यात 150वी विकेट घेतली होती.
-2013मध्ये पहिला बॉर्डर गावसकर सीरिजमधील कसोटी सामना झाला होता. विशेष म्हणजे हा सामना अश्विनच्या जन्मभूमीत, चेन्नईत झाला होता. यावेळी अश्विनने एका सामन्यात 10 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. असा पराक्रम करणारा तो दुसराच भारतीय क्रिकेटपटू होता.
-2015मध्ये श्रीलंकाविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यात अश्विनने 4 डावात संगकाराला सलग 4 वेळा बाद केले होते. ती संगकाराचा शेवटचा कसोटी सामना होता.
-अश्विनने त्याच्या सुरुवातीच्या कसोटी कारकिर्दीत 6 वेळा मालिकावीर पुरस्कार मिळवला होता. विशेष म्हणजे त्याने 36 कसोटी सामन्यात हा पराक्रम केला होता.
-अश्विन हा कसोटीत सर्वात जलद 50 विकेट्स घेणारा आणि सर्वात जलद 500 धावा पूर्ण करणारा भारतीय क्रिकेटपटू आहे.
-अश्विनला 2014मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2012-13मध्ये बीसीसीआय क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे.
-अश्विनने 2011मध्ये त्याची लहानपणीची मैत्रीण प्रिती नारायणशी लग्न केले.