संपुर्ण नाव- रॉबिन रामनारायण सिंग
जन्मतारिख- 14 सप्टेंबर, 1963
जन्मस्थळ- प्रिंसेस टाऊन, त्रिनिदाद
मुख्य संघ- भारत, दक्षिण त्रिनिदाद, तमिळनाडू आणि त्रिनिदाद
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (वेगवान)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख -7 ते 10 ऑक्टोबर, 1998
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख -11 मार्च, 1989
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 27, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 1, विकेट्स- 0, सर्वोत्तम कामगिरी- 0/00
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 136, धावा- 2336, शतके- 1
गोलंदाजी- सामने- 136, विकेट्स- 69, सर्वोत्तम कामगिरी- 5/22
थोडक्यात माहिती-
-रॉबिन सिंग यांचा जन्म त्रिनिदाद आणि टोबॅगो येथिल प्रिंसेस टाउनमध्ये झाला. त्यांनी वयाच्या 7व्या वर्षी वेस्ट इंडिजच्या शाळेत आणि क्लबमध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी क्रिकेटमध्ये कारकिर्द करण्याचे ठरवल्यामुळे ते वयाच्या 19व्या वर्षी चेन्नईत राहायला आले.
-त्यांना 1989 साली भारतीय नागरिकत्त्व मिळाले. त्याचवर्षी त्यांना ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून भारतीय वनडे संघात खेळण्याची संधी मिळाली. यावेळी अवघे दोन वनडे सामने खेळल्यानंतर त्यांना पुन्हा वनडेत खेळण्यासाठी 7 वर्षे वाट पाहावी लागली.
-याकाळात रॉबिन यांनी देशांतर्गत क्रिकेटमधील त्यांची कामगिरी चालू ठेवली. त्यामुळे त्यांना 1996साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टायटन चषकातून पुन्हा भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. त्यापुढे ते मर्यादीत षटकांच्या सामन्यात संघातील कायमचे खेळाडू बनले.
-रॉबिन सिंग हे अष्टपैलू क्रिकेटपटू होते. जे डाव्या हाताचे फलंदाज तर उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज होते. त्यांची मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळण्याची शैली प्रसिद्ध होती.
-रॉबिन यांनी ऑक्टोबर 1998मध्ये झिम्बाब्वे विरुद्धचा एकमेव कसोटी सामना खेळला होता. यावेळी त्यांना उल्लेखनीय कामगिरी न करता आल्याने तो सामना त्यांचा शेवटचा कसोटी सामना ठरला.
-क्रिकेटमधील निवृत्तीनंतर रॉबिन हे प्रशिक्षक बनले. सर्वप्रथम त्यांनी 19 वर्षांखालील भारतीय संघाला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
-2004 साली ते हाँगकाँगच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या प्रशिक्षणाखाली संघ त्यावर्षातील आशिया चषकातही पोहोचला होता.
-2006साली ते भारत अ संघाचे प्रशिक्षक होते. त्यावेळी त्यांनी गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांना क्रिकेटच्या बारीकसारीक गोष्टी शिकवल्या होत्या.
-शिवाय 2007 ते 2009 या काळात ते भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक होते.
-आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच 2008साली ते डेक्कन चार्जर्सचे मुख्य प्रशिक्षक होते.
-ते आयपीएलच्या मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत.
-शिवाय ते बांगलादेश प्रिमियर लीग, श्रीलंका प्रिमियर लीगमधील संघाचेही प्रशिक्षक होते.
-अरुण कुमार लयम यांच्या मदतीने रॉबिन यांनी न्यू जर्सी येथे रॉबिनसिंग क्रिकेट फाऊंडेशनची स्थापना केली.