---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर रॉबिन उथप्पा

---Advertisement---

संपुर्ण नाव- रॉबिन वेनू उथप्पा

जन्मतारिख- 11 नोव्हेंबर, 1985

जन्मस्थळ- कूर्ग, कर्नाटक

मुख्य संघ- भारत, एअर इंडिया, एअर इंडिया रेड, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, भारत अ, भारत ब, इंडिया ब्ल्यू, इंडिया रेड, इंडिया ग्रीन, 19 वर्षांखालील भारतीय संघ, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, कर्नाटक, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन अध्यक्षयी एकादश, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन एकादश, केरळ, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, पुणे वॉरियर्स,, शेष भारतीय संघ, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सौराष्ट्र आणि उत्तर विभाग 

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज

क्षेत्ररक्षणाची जागा – यष्टीरक्षक

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 15 एप्रिल, 2006

आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध स्कॉटलँड, तारिख – 23 सप्टेंबर, 2007

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 46, धावा- 934, शतके- 0

आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 13, धावा- 249, शतके- 0

थोडक्यात माहिती-

-रॉबिन उथप्पा याचे वडील वेनू हे हिंदू आणि आई रोझिलीन या ख्रिश्चन आहेत. त्याने व त्याच्या बहीणीने 2000मध्ये ख्रिश्चन धर्माचा स्विकार केला.

-त्याचे वडील हे आंतरराष्ट्रीय हॉकी पंच होते. तसेच ते कर्नाटक हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष होते.

-उथप्पा जेव्हा 10 वर्षांचा हेता. तेव्हा त्याला फेफरे(epilepsy) येणे हा आजार होता. यामुळे त्याच्या पचन क्रियेत अडचणी येत असत आणि यामुळे त्यांचे खूप जास्त वजन वाढले होते. पुढे त्याने आहार तज्ञाची मदत घेत 20 किलो वजन कमी केले होते.

-उथप्पाने 2002 साली वयाच्या 17व्या वर्षी कर्नाटककडून रणजी ट्रॉफीत पदार्पण केले होते. यावेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत त्याने जलद 40 धावा केल्या होत्या.

-तो 2004 सालच्या आयसीसी 19 वर्षांखालील भारतीय विश्वचषक संघाचा भाग होता. त्यावेळी संघाचा कर्णधार अंबाती रायडू होता. तसेच त्याला सुरेश रैना, शिखर धवन, रुद्र प्रताप सिंग, विक्रम राज विर आणि दिनेश कार्तिक यांच्यासह खेळण्याची संधी मिळाली होती.

-2006 साली त्याला इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका खेळण्याची संधी मिळाली. यावेळी त्याने वनडे पदार्पणाच्या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला. त्याने त्या सामन्यात 86 धावा केल्या होत्या. त्याच्यापुर्वी 1974मध्ये ब्रिजेश पटेल यांनी 82 धावा करत हा विक्रम केला होता.

-2007च्या आयसीसी टी20 विश्वचषकमधून उथप्पाने टी20त पदार्पण केले होते. यावेळी स्कॉटलँडविरुद्ध तो शून्यावर बाद झाला होता. मात्र, पुढील पाकिस्तानविरुद्धच्या टी20 सामन्यात टी20 सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले होते.

-उथप्पाने त्याची फलंदाजी शैली उत्कृष्ट बनवण्यासाठी वैयक्तिक फलंदाज प्रशिक्षक म्हणून भारताचे माजी फलंदाज प्रविन अमरे यांची नियुक्ती केली होती.

-आयपीएल 2014मध्ये त्याने ऑरेंज कॅप मिळवली होती. त्यावेळी तो सचिन तेंडूलकरनंतर असा कारनामा करणारा एकमेव फलंदाज बनला. त्याने 2014 साली आयपीएलमध्ये 10वेळा 40 पेक्षा जास्त धावा करत नविन विक्रमही आपल्या नावावर केला होता.

-2013-14 या काळात उथप्पाने अनेक विजय आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने कर्नाटकला रणजी ट्रॉफीत विजय मिळवून दिला होता. तसेच विजय हजारे आणि इराणी ट्रॉफीतही विजय मिळवला होता.

-मार्च 2016मध्ये उथप्पाने शीतल गौतम हिच्याशी लग्न केले. तिने राज्य आणि जिल्हा स्तरावर टेनिस खेळले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---