संपुर्ण नाव- सदानंद विश्वनाथ
जन्मतारिख- 29 नोव्हेंबर, 1962
जन्मस्थळ- बंगळुरु, कर्नाटक
मुख्य संघ- भारत आणि कर्नाटक
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
क्षेत्ररक्षणाची जागा – यष्टीरक्षण
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 30 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर, 1985
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 20 जानेवारी, 1985
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 3, धावा- 31, शतके- 0
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 22, धावा- 72, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-सदानंद विश्वनाथ यांना चांगल्या यष्टीरक्षक क्रिकेटपटूंमध्ये गणले जाते. सय्यद किरमानी यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळालगत विश्वनाथ यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्याने त्यांना संघात संधी मिळण्यासाठी जास्त कष्ट करावे लागले नव्हते.
-मात्र, त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीलाच दुख:द घटना घडली. त्यांच्या वडिलांनी पैशाच्या अडचणीमुळे आत्महत्या केली आणि त्यांच्या आईचे आजाराने निधन झाले होते. याचा परिणाम त्यांच्या खेळावरती झाला. ते चांगली कामगिरी न करू शकल्यामुळे त्यांच्या बदल्यात किरण मोरे आणि चंद्रकांत पंडित यांना संघात संधी देण्यात आली होती.
-विशेष म्हणजे 1980च्या दशकात ते पहिले आणि एकमेव असे यष्टीरक्षक ठरले होते, ज्यांचे सर्वाधिक पोस्टर्स देशभरात विकले गेले होते. त्यामुळे त्यांना पोस्टर बॉय असेही म्हटले जाते.
-विश्वनाथ यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर 2 वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली होती. 3 कसोटी सामन्यात त्यांनी यष्टीमागे 11 झेल घेतले होते. तर, 22 वनडे सामन्यात त्यांनी यष्टीमागे 17 झेल घेतले होते आणि 7 फलंदाजांना यष्टीचीत केले होते.
-देशांतर्गत स्तरावर खेळताना त्यांनी 31 च्या सरासरीने 3158 धावा केल्या होत्या. तर, 134वेळा यष्टीमागील झेल घेतले होते आणि 34वेळा फलंदाजांना यष्टीचीत केले होते.
-1985मध्ये बेन्सन आणि हेजेस या वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत विश्वनाथ यांनी 5 सामन्यात यष्टीमागे 9 झेल आणि 3 यष्टीचीत अशा एकूण 9 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळेला पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्यांनी मुद्दसर नाझर यांचा यष्टीमागील झेल घेत आणि जावेद मियाँदाद यांना यष्टीचीत करत विशेष कामगिरी केली होती.
-1986-87च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत त्यांनी 70 आणि 40 धावा करत, यष्टीमागे 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर त्यांनी 9 वनडे सामने खेळले.
-वयाच्या 23व्या वर्षी त्यांना दारूचे व्यसन लागल्याने आपल्या देशांतर्गत कारकिर्दीवर विराम लावावा लागला.
-त्यानंतर त्यांनी बंगळुरु येथे आपली बँकेतील नोकरी करण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यांची बंगळुरु बाहेर बदली करण्यात आल्याने त्यांनी ती नोकरी सोडली.
-पुढे त्यांनी 2008-09पर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंचाचे काम केले होते. शिवाय त्यांनी महिलांच्या विश्वचषकातही पंच म्हणून पदभार सांभाळला आहे.
-तसेच कर्नाटक सरकारच्या मदतीने त्यांनी ऑटोमोबाईल शोरूमही काढले.
-आता त्यांची बंगळुरुमधील कुंडलहल्ली येथे क्रिकेट प्रशिक्षण अकॅडमी आहे.