संपुर्ण नाव- संदिप मधुसुदन पाटील
जन्मतारिख- 18 ऑगस्ट, 1956
जन्मस्थळ- बॉम्बे (आताची मुंबई), महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत, मध्य प्रदेश आणि मुंबई
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 15 ते 20 जानेवारी, 1980, ठिकाण – चेन्नई
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 6 डिसेंबर, 1980, ठिकाण मेलबर्न
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 29, धावा- 1588, शतके- 4, सर्वोत्तम कामगिरी – 174 धावा
गोलंदाजी- सामने- 29, विकेट्स- 9, सर्वोत्तम कामगिरी- 2/28
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 45, धावा- 1005, शतके- 1, सर्वोत्तम कामगिरी- 84
गोलंदाजी- सामने- 45, विकेट्स- 15, सर्वोत्तम कामगिरी- 2/28
थोडक्यात माहिती-
-संदिप पाटील यांचे वडील मधुसुदन पाटील हे प्रथम श्रेणी क्रिकेटर होते. त्यांनी खूप कमी वयात क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. शिवाय त्यांचे वडील हे राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटूही होते. त्यांनी टेनिस आणि फूटबॉलही खेळले होते.
-भारतीय क्रिकेटची नर्सरी म्हणून ओळखले जाणारे शिवाजी पार्क येथे संदिप पाटील यांनी क्रिकेट खेळले आहे. यासाठी त्यांनी सुभाष आपटे, विजय मांजरेकर, रमाकांत देसाई आणि अजीत वाडेकर यांची प्रेरणा घेतली होती. यांनीही शिवाजी पार्कमध्ये क्रिकेट खेळले आहे.
-मध्यमगती गोलंदाज पाटील यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 21 विकेट्स घेतल्या होत्या. तर, देशांतर्गत स्तरावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 86 आणि अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 29.93च्या उल्लेखनीय सरासरीने 46 विकेट्स घेतल्या होत्या.
-1978-79च्या हंगामात देशांतर्गत क्रिकेटमध्ये पाटील यांनी 102 षटकार पूर्ण केले होते. पारसी जिमखाना येथे खेळलेल्या सामन्यात त्यांनी 21 षटकार ठोकले होते. यावेळी त्यांनी मारलेल्या षटकारामुळे एक चेंडू मरिन ड्राइव्हवरुन शेजारच्या अरबी समुद्रामध्ये गेला होता
-प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्यांची 210 धावा ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. ही खेळी त्यांनी सौराष्ट्र विरुद्ध केली होती. त्यावेळी त्या सामन्यात वानखेडे स्टेडियमच्या पुढे असणाऱ्या हॉकी स्टेडियमध्ये त्यांनी षटकार मारलेलाचा चेंडू पडला होता.
-24 वर्षाचे असताना पाटील यांनी त्यांचा 5वा कसोटी सामना खेळताना ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज डेनिस लिली, रॉडनी हॉग आणि लेन पास्को अशा गोलंदाजांविरुद्ध खेळताना शतक केले होते. त्यापुर्वीच्या कसोटीत त्यांना फलंदाजी करताना हेल्मेट नसल्यामुळे चेंडू लागून दुखापत झाली आणि 65 धावांवर त्यांना सामन्यातून बाहेर पडावे लागण्याची वेळ आली होती. मात्र, त्यांनी हार न मारता पुढच्या सामन्यात फलंदाजी केली आणि 174 धावा केल्या होत्या.
-1982मध्ये मॅंचेस्टर येथे पाटील यांनी नवा विक्रम नोंदवला होता. त्यांनी इंग्लंडचे गोलंदाज बॉब विलिस यांच्या षटकात सलग 6 चेंडूत 6 चौकार ठोकण्याचा पराक्रम केला होता. या सामन्यात पाटील यांनी 129 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांना सलामीवीर पुरस्कार देण्यात आला होता.
-पाटील यांना प्रवास करण्याची खूप आवड होती. विशेषत: जंगली भागात फिरण्याची. 2012मध्ये त्यांनी हरभजन सिंग आणि युसुफ पठाण यांच्यासह मिळून वनरक्षकाचे काम केले होते आणि शक्य तितके वनसंवर्धन्याची प्रतिज्ञा केली होती.
-ते राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तर होतेच, तसेच ते प्रशिक्षक आणि निवडकर्ताही होते. शिवाय, त्यांनी सॅंडी स्टॉर्म हे आत्मचरित्र लिहिले आहे. तसेच ते व्यावसायिकही होते.
-पाटील हे ‘एकच षटकार’ या मराठी क्रिडा मासिकाचे संपादक होते.
-त्यांनी कभी अजनबी सिनेमात मुख्य भूमिका केली आहे. याच चित्रपटात सय्यद किरमानी यांनी गुंड्याची भूमिका केली आहे.
-पाटील यांचा मुलगा चिराग पाटील हा मराठी अभिनेता आहे. त्याचा पहिला चित्रपट राडा रॉक्स हा होता.