---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर संजय राऊल

---Advertisement---

संपुर्ण नाव- संजय सुसंत राऊल

जन्मतारिख- 6 ऑक्टोबर, 1976

जन्मस्थळ- कटक, ओडिसा

मुख्य संघ- भारत आणि ओडिसा

फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 13 सप्टेंबर, 1998

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 2, धावा- 8, शतके- 0

गोलंदाजी- सामने- 2, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/13

थोडक्यात माहिती-

-संजय राऊल हा ओडिसातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या 3 क्रिकेटपटंपैकी एक होता. देबाशिष मोहंतीनंतर राऊल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा दुसरा क्रिकेटपटू होता.

-1993-94 साली आपल्या देशांतर्गत कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या राऊलला 1997-88च्या पाकिस्तान अ दौऱ्यावर पहिल्यांदा संघात संधी मिळाली नव्हती.

-त्याने पेशावरविरुद्धच्या अनधिकृत कसोटीत खेळताना शतक ठोकण्याचा पराक्रम केला होता. संपूरेण कसोटीत त्याने 96च्या सरासरीने 287 धावा केल्या होत्या.

-त्याने ओडिसाकडून 1997च्या रणजी ट्रॉफी हंगामात 37च्या सरासरीने 644 धावा केल्या होत्या. तसेच 21 च्या सरासरीने 37 विकेट्स घेत, ओडिसा संघाकडून सर्वोत्कृष्ट खेळी केली होती.

-राऊलला भारतीय संघात प्रवेश करण्याची संधी तेव्हा मिळाली, जेव्हा भारताचे 2 संघ कॉमनवेल्थ गेम्स आणि सहारा चषक खेळण्यासाठी गेले होते. राऊलला पाकिस्तानविरुद्ध सहारा चषकात खेळण्याची संधी मिळाली होती.
-त्याने पाकिस्तानविरुद्ध 2 वनडे खेळले, ज्यात 13 चेंडूत त्याने 8 धावा केल्या. त्याने वनडेत इंजमाम उल हक यांची एकमेव विकेट घेतली होती.
-राऊलने ओडिसाकडून देशांतर्गत कारकिर्दीत 45च्या सरासरीने 4363 धावा केल्या होत्या. तर 27च्या सरासरीने 115 विकेट्स घेतल्या होत्या.
-तो आता रणजी ट्रॉफीत सामना रेफरी आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---