संपुर्ण नाव- सौरभ सुनिल तिवारी
जन्मतारिख- 30 डिसेंबर, 1989
जन्मस्थळ- जमशेदपूर, बिहार
मुख्य संघ- भारत, बिहार, 14 वर्षांखालील बिहार संघ, दिल्ली डेअरडेविल्स, इंडिया ग्रीन, इंडिया रेड, 19 वर्षांखालील भारतीय संघ, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, झारखंड, मुंबई इंडियन्स, शेष भारतीय संघ, राइजिंग पुणे सुपरजायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि टाटा स्पोर्ट्स क्लब
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 20 ऑक्टोबर, 2010, ठिकाण – विशाखापट्टणम
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 3, धावा- 49, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-सौरभ सुनिल तिवारी हा जमशेदपूर येथे लहानाचा मोठा झाला. वयाच्या 11व्या वर्षापासून त्याने क्रिकेटला गांभिर्याने घेण्यास सुरुवात केली.
-वयाच्या 14व्या वर्षी तिवारीने झारखंडकडून रणजी ट्रॉफीत पदार्पण केले. ते वर्ष 2006-07 हे होते.
-19 वर्षांखालील मालिकेत बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तिवारीने अर्धशतक केले होते. यामुळे त्याला 2008मध्ये मलेशियातील 19 वर्षांखालील विश्वचषकात संधी मिळाली.
-पुढे मधल्या फळीत फलंदाजी करत तिवारीने 2009-10च्या संपूर्ण रणजी ट्रॉफी हंगामात 3 शतके ठोकली.
-2010मध्ये आयपीएलमधील मुंबई इंडियन्सकडून खेळताना तिवारीने 16 सामन्यात 29 पेक्षा जास्त सरासरीने 419 धावा केल्या होत्या. तिथून त्याला 23 वर्षांखालील संघातही प्रवेश मिळाला.
-तिवारीने 2011मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये प्रवेश केला होता. मात्र पुढील 2 हंगामात त्याची कामगिरी खराब असल्यामुळे त्याला संघातून बाहेर पडावे लागले आणि 2014मध्ये त्याला दिल्ली डेअरडेविल्सने विकत घेतले.
-तिवारी हा देशांतर्गत क्रिकेटमधील कायमचा खेळाडू आहे. तो झारखंडकडून देशांतर्गत क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात खेळतो.