संपुर्ण नाव- नंदलाल शिवलाल यादव
जन्मतारिख- 26 जानेवारी, 1957
जन्मस्थळ- हैद्राबाद, आंध्र प्रदेश
मुख्य संघ- भारत आणि हैद्राबाद
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (फिरकीपटू)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख -19 ते 24 सप्टेंबर, 1979
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख -11 जानेवारी, 1986
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 35, धावा- 403, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 35, विकेट्स- 102, सर्वोत्तम कामगिरी- 5/76
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 7, धावा- 1, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 7, विकेट्स- 8, सर्वोत्तम कामगिरी- 2/18
थोडक्यात माहिती-
-नंदलाल शिवलाल यादव यांचा मुलगा अर्जून यादव याची 1999-2000मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली होती. मात्र, त्याला यावेळी एकही सामना खेळता आला नाही. तरी, त्याची प्रथम श्रेणीतील कामगिरी उल्लेखनीय आहे.
-यादव हे भारताचे माजी फिरकीपटू गोलंदाज होते. त्यांनी भारताकडून 35 कसोटी तर 7 वनडे सामने खेळले होते.
-ज्यावेळेला भारताकडे इरापल्ली प्रसन्ना, श्रीनिवास वेंकटराघवन, बिशन सिंग बेदी आणि भागवत चंद्रशेखर यांच्यासारखे फिरकी गोलंदाज होते. त्यावेळेला यादव यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले होते.
-8 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत शिवलाल यांनी रवि शास्त्री आणि दिलीप दोशी यांच्यासह मिळून फिरकीपटूंचा जोरदार त्रिकूट निर्माण केला होता.
-यादव हे कर्णधारपदासाठी एक विश्वासार्ह क्रिकेटपटू होते. मात्र, त्यांना कर्णधार बनण्याची संधी मिळाली नव्हती.
-ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून कसोटीत पदार्पण करणाऱ्या शिवलाल यांनी 5 कसोटीत 24 विकेट्स घेतल्या होत्या. यात त्यांनी एका डावात 4 विकेट्स घेण्याचा कारनामा 3 वेळा केला होता.
-शिवलाल यांनी सुरुवातीलाच मिळवलेल्या दमदार यशामुळे श्रीनिवास वेंकटराघवन यांना संघातून वगळण्यात आले होते.
-1981 ते 82मध्ये त्यांचा फॉर्म खराब झाल्यामुळे त्यांना संघातून काही काळ बाहेर करण्यात आले होते. मात्र, 1983मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून त्यांनी कसोटीत पुनरागमन केले. यावेळी पहिल्याच डावात त्यांनी 5 विकेट्स घेऊन दमदार कामगिरी केली होती.
-त्यानंतर, 1985-86च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यातील कसोटी मालिकेत त्यांनी 15 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. या मालिकेतील सिडनी येथे झालेला अंतिम सामन्यात यादव यांनी 118 धावा देत 8 विकेट्स घेतल्याने भारताने ती मालिका जिंकली होती.
-यादव यांनी तयांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन 1986साली श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत केले होते. यैवेळी 76 धावा देत त्यांनी घेतलेल्या 5 विकेट्समुळे भारताने तो सामना पहिल्या डावाच्या आघाडीवर आणि 106 धावांनी जिंकला होता.
-पाकिस्तानविरुद्धच्या 1987 सालच्या कसोटीत त्यांनी 100 विकेट्स पूर्ण केल्या होत्या.
-निवृत्तीनंतर, यादव हे राष्ट्रीय निवडकर्ता होते. त्यांना विशेषत: मोहम्मद अझरुद्दीन यांना कर्णधारपदावरून काढून टाकल्याचा मोठा निर्णय घेतला होता.
-2000-2009 याकाळात ते हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनचे सचिव होते. तर, 2013साली त्यांची बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदी निवड झाली होती.
-शिवाय 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांना सर्व नॉन आयपीएल कामांसाठी बीसीसीआयचा अंतरिम प्रमुख म्हणून नेमले होते.