---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर चंद्रकांत पंडित

---Advertisement---

संपुर्ण नाव- चंद्रकांत सिताराम पंडित

जन्मतारिख- 30 सप्टेंबर, 1961

जन्मस्थळ- बॉम्बे (आताची मुंबई), महाराष्ट्र

मुख्य संघ- भारत, आसाम, मध्य प्रदेश आणि मुंबई

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण-  भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख -19 ते 23 जून, 1986

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 10 एप्रिल, 1986

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द- 

फलंदाजी- सामने- 5, धावा- 171, शतके- 0

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 36, धावा- 290, शतके- 0

थोडक्यात माहिती-

-चंद्रकांत पंडित हे प्रसिद्ध यष्टीरक्षक तर होतेच. पण, याचबरोबर ते चांगले फलंदाजही होते.

-ते 1980च्या दशकातील त्या खेळाडूंपैकी एक होते, ज्यांमध्ये सय्यद किरमानी यांच्या बदल्यात संघात यष्टीरक्षण करण्याची क्षमता होती.

-त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 कसोटी आणि36 वनडे सामने खेळले. यातील 5 कसोटीपैकी 3 सामन्यात ते मधल्या फळीतील फलंदाज होते. यावेळी फलंदाजी करताना त्यांनी 171 धावा केल्या होत्या.

-1991-92साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जेव्हा किरण मोरे संघातून बाहेर होते. तेव्हा चंद्रकांत यांना यष्टीरक्षणासाठी संधी देण्यात आली होती. यावेळी त्यांनी यष्टीमागे 11 विकेट्स घेत त्यांच्यातील कौशल्य दाखवून दिले होते.

-त्यांच्या फलंदाजी कामगिरीमुळे त्यांना वनडेतील 36 सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली. परंतु याकाळात ते विशेष कामगिरी करू शकले नाहीत.

-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर चंद्रकांत यांनी प्रशिक्षणास सुरुवात केली आणि आता त्यांना देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध प्रशिक्षक म्हणून ओळखले जाते.

-ज्याप्रमाणे चंद्रकांत यांनी त्यांच्या कारकिर्दीत बरेचसे विजय मिळवले. त्याचप्रमाणे त्यांनी विदर्भ संघाला प्रशिक्षण करतानाही अनेक रणजी ट्रॉफी सामने जिंकून दिले होते.

-2017-18च्या हंगामात त्यांनी विदर्भास प्रशिक्षण करण्यास सुरुवात केली. त्यापुढील 2 हंगामात चंद्रकांत यांच्या प्रशिक्षणाखाली विदर्भने 22 रणजी ट्रॉफी सामने खेळले, ज्यातील सर्व सामने विदर्भने जिंकले.

-शिवाय 2017-18 आणि 2018-19च्या हंगामातही त्यांनी विदर्भ संघाला इराणी ट्रॉफीत प्रशिक्षण करत विजेतेपद मिळवून दिले आहे. यापुर्वी त्यांनी मुंबई संघालाही आपल्या प्रशिक्षणाखाली रणजी ट्रॉफी चषक मिळवून दिले होते.

-2020-21च्या हंगामात त्यांनी विदर्भ संघाकडून मध्य प्रदेश संघाचे प्रशिक्षण करण्याचा निर्णय घेतला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---