संपुर्ण नाव- शांताकुमारन श्रीसंत
जन्मतारिख- 6 फेब्रुवारी, 1983
जन्मस्थळ- कोथमंगलम, केरळ
मुख्य संघ- भारत, आशिया एकादश, केरळ, 19 वर्षांखालील केरळ संघ, किंग्स इलेव्हन पंजाब, कोची टस्कर्स केरळ, राजस्थान रॉयल्स आणि वार्विकशायर
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 1 ते 5 मार्च, 2006
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 25 ऑक्टेबर, 2005
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 1 डिसेंबर, 2006
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 27, धावा- 281, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 27, विकेट्स- 87, सर्वोत्तम कामगिरी- 5/40
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 53, धावा- 44, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 53, विकेट्स- 75, सर्वोत्तम कामगिरी- 6/55
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 10, धावा- 20, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 10, विकेट्स- 7, सर्वोत्तम कामगिरी- 2/12
थोडक्यात माहिती-
-शांताकुमारन श्रीसंत हा केरळमधील शांताकुमारन नायर आणि सावित्रीदेवी यांचा मुलगा आहे. त्याचे मित्र त्याला गोपू म्हणत असत.
-श्रीसंतला एक मोठा भाऊ आणि 2 मोठ्या बहिणी आहेत. त्याचा भाऊ दिपू संथन हा कोचीतील म्यूझिक कंपनीचा मालक आहे. त्याची मोठी बहीण निवेदिता ही केरळमधील टीव्ही अभिनेत्री आहे. तर, त्याची दुसरी बहीण दिव्या हिने दाक्षिणात्त्य प्लेबॅक गायक मधू बालकृष्णन यांच्याशी लग्न केले.
-श्रीसंतने 12 डिसेंबर 2013ला जयपूर येथे भुवनेश्वरी कुमारी हिच्याशी लग्न केले. त्यांना श्रीसांविक श्रीसंत आणि सुयश्री श्रीसंत ही मुले आहेत.
-श्रीसंत लहानपणी फिरकी गोलंदाजी करत असे. पुढे त्याच्या यॉर्करमुळे त्याने वेगवान गोलंदाजी करण्यास सुरुवात केली.
-नोव्हेंबर 2004मध्ये त्याने हिमाचल प्रदेशविरुद्ध रणजी ट्रॉफीत हॅटट्रिक मारण्याचा विक्रम केला होता.
-मार्च 2006मध्ये त्याला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली. यावेळी त्याने 95 धावा देत 4 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.
-श्रीसंतने कसोटीतील त्याची छाप दक्षिण आफ्रिकेविरु्दधच्या सामन्यात पाडली. यावेळी 2006साली जाहान्सबर्ग येथे 40 धावा देत 5 विकेट्स घेत, त्याने दक्षिण आपफ्रिकेचा सामना अवघ्या 84 धावांवर संपवला. यामुळे त्याला सलामीवीर पुरस्कारही देण्यात आला होता.
-याचवर्षी काही सांख्यिकी कारणावरून श्रीसंतने त्याचे नावात एस ऐवजी यु वापरल्याचे सांगितले जात होते. पण त्याने पुढे स्पष्ट केले की, त्याचे नाव त्याच्या वडिलांच्या नावावरून ठेवले गेले असल्याने त्याच्यात कोणताही बदल करणार नाही.
-25 अप्रिल 2008 ला श्रीसंतला एका घटनेला सामोरे जावे लागले होते. यावेळी मुंबई इंडियन्स विरुद्द किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये आयपीएलचा सामना चालू होता तेव्हा हरभजन सिंगने त्याला गोलंदाजीच्या कारणावरून मैदानात चापट मारली होती. त्यामुळे श्रीसंत मैदानातच रडला होता. पुढे ड्रेसिंग रूममध्ये भज्जीने त्याची क्षमा मागितली.
-मे 2013ला आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्या प्रकरणी श्रीसंत आणि त्याचे राजस्थान रॉयल्सचे संघसहकारी अजित चंडीला आणि अंकित चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. पुढे सप्टेंबर 2013ला बीसीसीआयच्या शिस्त समितीने त्याला क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निलंबीत केले. तर, जुलै 2015मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात तो निर्दोष सुटला.
-श्रीसंत हा मानसशास्त्रचा विद्यार्थीदेखील आहे.
-तो प्राविण्य ब्रेकडान्सरही आहे. तो आठवीत असताना ब्रेक डान्सिंगमध्ये राष्ट्रीय विजेत ठरला होता. तर त्याच्या या शैलीमुळे त्याला टीव्ही सिरियल्समध्ये काम करण्याची संधी मिळाली.
-त्याने प्रभु देवा आणि प्रकाश राज यांच्यासह बिग पिक्चर (2015) या सिनेमात काम केले आहे. तसेच त्याने टीम 5 (2017) मल्याळम, अक्सर 2 (2017) आणि कॅबरे (2019) या हिंदी सिनेमातही काम केले आहे.
-तसेच श्रीसंत हा दिपिका कक्कर हिच्यासह झलक दिखला जा या डान्स शोमध्येही होता.
-श्रीसंतने काही वर्षांपुर्वीच कोचीमध्ये त्याचे स्वतचे स्पोर्ट शॉप काढले आहे. त्याचे नाव एस36 असे आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हनुमा विहारीला स्वत:चं करिअर घालायचंय धोक्यात? धक्कादायक खुलासा करत म्हणाला, ‘यानंतर क्रिकेट खेळता…’
पाकिस्तानमध्ये स्टेडियमजवळ बॉम्बस्फोट, बाबर आझम आणि शाहिद आफ्रिदीच्या सुरक्षेसाठी थांबवला सामना