संपुर्ण नाव- स्टुअर्ट टेरेंस रॉगर बिन्नी
जन्मतारिख- 3 जून, 1984
जन्मस्थळ- बेंगलोर, कर्नाटक
मुख्य संघ- भारत, हैद्राबाद हिरोज, आयसीएल भारत एकादश, मुंबई इंडियन्स, कर्नाटक, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दक्षिण विभाग
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 9 ते 13 जुलै, 2014, ठिकाण – नॉटिंघम
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 28 जानेवारी, 2014, ठिकाण – हॅमिल्टन
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 17 जुलै, 2015, ठिकाण – हरारे
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 6, धावा- 194, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 6, विकेट्स- 3, सर्वोत्तम कामगिरी- 2/24
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 14, धावा- 230, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 14, विकेट्स- 20, सर्वोत्तम कामगिरी- 6/4
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 3, धावा- 35, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 3, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/14
थोडक्यात माहिती-
-स्टुअर्ट बिन्नी याचे वडील रॉगर बिन्नी हे माजी भारतीय कसोटीपटू होते. विशेष म्हणजे ते 1983च्या यशस्वी विश्वचषकाचा भाग होते. पण त्यावेळी त्यांनी एकही सामना खेळला नव्हता.
-स्टुअर्ट हा बेंगलोरमध्ये जन्मला आणि तिथेच लहानाचा मोठाही झाला. तो एसटी. जोसेफ आरतीय महाविद्यालयात शिकला. त्याचे वडील त्या शाळेचे मुख्य प्रशिक्षक होते. तसेच त्याने आयएसीएमध्ये इम्तियाज अहमदच्या हाताखाली प्रशिक्षणही घेतले आहे.
-2014ला हॅमिलटन येथील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून स्टुअर्टने वनडेत पदार्पण केले होते. यावेळी त्याला फक्त 1 षटक गोलंदाजी करायला मिळाली होती.
-2014मध्ये ढाका येथे बांग्लांदेशविरुद्ध आपला दुसरा वनडे सामना स्टुअर्टने गाजवला होता. यावेळी 4 धावा देत 6 विकेट्स घेण्याचा त्याने पराक्रम केला होता. यासह 1993मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध हिरो चषकाच्या अंतिम सामन्यात अनिल कुंबळेंनी केलेला 6/12 हा विक्रम स्टुअर्टने मोडला होता.
-वयाच्या 30व्या वर्षी 2014मध्ये स्टुअर्टला कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली होती. त्याने नॉटिंघम येथील इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतून पदार्पण केले होते. यावेळी कसोटीच्या दुसऱ्या डावात जेव्हा भारत 184 धावांवर होता. तेव्हा 8व्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने 78 धावा केल्या होत्या.
-आयसीएलमध्ये 2 हंगाम घालवल्यानंतर 2010मध्ये स्टुअर्टला आयपीएलच्या मुंबई इंडियन्सने विकत घेतले. तर, 2011 मध्ये तो राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. 2017मध्ये त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 2 कोटींना विकत घेतले.
-स्टुअर्टने प्रसिद्ध स्पोर्ट्स टीव्ही होस्ट मयंती लँगरशी 2012मध्ये लग्न केले.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
लॉर्ड्समध्ये दिवंगत वॉर्नला दिली गेली खास श्रद्धांजली, २३ सेकंद स्टेडियममध्ये झाला टाळ्यांचा गजर
वाढदिवस विशेष: गल्ली क्रिकेटर ते सुलतान ऑफ स्विंग कसा झाला अक्रम?
जेव्हा तब्बल ४२ चौकारांसह विवियन रिचर्ड्स यांनी ठोकले होते तुफानी त्रिशतक, वाचा त्या खास खेळीबद्दल