संपुर्ण नाव- सुनिल मनोहर गावसकर
जन्मतारिख- 10 जुलै, 1949
जन्मस्थळ- बॉम्बे ( आताची- मुंबई ), महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत, मुंबई आणि सोमरसेत
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 6 मार्च ते 10 मार्च, 1971
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 13 जुलै, 1974
आंतरराष्ट्रीय कसोटी सामने- 125, धावा- 10122, शतके- 34
आंतरराष्ट्रीय वनडे सामने– 108, धावा- 3092, शतके- 1
थोडक्यात माहिती-
-सुनिल गावसकर यांनी ‘सावली प्रेमाची’ या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका केली आहे. याचबरोबर त्यांनी या चित्रपटात ‘या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला’ हे गाणे म्हटले आहे.
– त्रिनिदाद कॅलिप्सोतील गायक लॉर्ड रिलेटर (विलिअर्ड हॅरिस) यांनी गावस्करांच्या सन्मानार्थ “गावसकर कॅलिप्सो” हे गाणे लिहिले आहे.
-गावसकर यांनी त्यांच्या रणजी ट्रॉफीतील पहिला सामना म्हैसूर संघाविरुद्ध खेळला. यावेळी ते अवघ्या 5व्या चेंडूवर बाद झाले होते. मात्र, त्यांनी पुढील 3 रणजी सामन्यात शतकी खेळी केली होती.
-1971च्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्यांनी 4 सामन्यात 774 धावा केल्या होत्या. त्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून त्यांनी कसोटीत पदार्पण केले होते. याचबरोबर त्यांनी पदार्पणाच्या सामन्यातच 2 अर्धशतके केली होती. ज्यामुळे भारताने पहिल्यांदाच विंडीजविरुद्ध कसोटी सामना जिंकला होता.
-पुढे त्यांनी 13 एप्रिल 1971च्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात शतकी (124) तर, दुसऱ्या डावात द्विशतकी (220) खेळी केली होती. त्यामुळे एकाच सामन्यात शतक आणि द्विशतक ठोकणारे ते कसोटी इतिहासातील दुसरेच फलंदाज ठरले. प्रथम स्थानाचा हा विक्रम ऑस्ट्रेलियाचे डग वॉल्टर्स यांच्या नावावर आहे.
-1974 मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे चालू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात गावस्कर फलंदाजी करत होते. त्यावेळी त्यांचे केस सारखे डोळ्यात जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी मैदानावरील पंच डिकी बर्ड यांना त्यांचे केस केपण्याची विनंती केली. यासाठी बर्ड यांनी तयारी दाखवली. त्यांनी त्यांच्याकडे चेंडूच्या शिवणीचे धागे कापण्यासाठी असणाऱ्या कात्रीने गावस्करांचे केस कापले होते.