संपुर्ण नाव- सुरेंद्र विठ्ठल नायक
जन्मतारिख- 20 ऑक्टोबर, 1954
जन्मस्थळ- बॉम्बे (आताची मुंबई), महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत आणि मुंबई
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज आणि फिरकीपटू
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 24 ते 28 जून, 1982, ठिकाण – मँचेस्टर
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 20 डिसेंबर, 1981, ठिकाण – जलंधर
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 2, धावा- 19, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 2, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/16
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 4, धावा- 3, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 4, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/51
थोडक्यात माहिती-
-सुरेंद्र नायक यांनी कारकिर्दीत केवळ 1980-81 आणि 1981-82 च्या हंगामात उल्लेखनीय कामगिरी केली होती. या काळात त्यांनी 33च्या सरासरीने 330 धावा केल्या होत्या. तर 21च्या सरासरीने 34 विकेट्स घेतल्या होत्या.
-नायक यांची 1982च्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी पहिल्यादांच भारतीय संघात निवड झाली होती. सुनिल गावसकर दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले होते म्हणून त्यांच्या बदल्यात नायक यांना संघात घेण्यात आले होते. मात्र, त्यांना संधी मिळालेल्या दोन्ही कसोटीत चांगली कामगिरी करता आली नव्हती. यावेळी त्यांनी 132 धावा देत अवघी 1 विकेट घेतली होती.
-त्यांच्या वनडे कारकिर्दीतील 4 सामन्यातही त्यांना विशेष कामगिरी करती आली नव्हती. त्यांनी 161 धावा देत अवघी 1 विकेट घेतली होती.
-नायक यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी ही त्यांनी रणजी ट्रॉफीत केली होती. त्यांनी 1980-81च्या रणजी ट्रॉफी अंतिम सामन्यात मुंबईकडून 31 धावा देत 2 आणि 65 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.
-तर, त्यापुर्वीच्या रणजी ट्रॉफी उपांत्य सामन्यात त्यांनी पहिल्या डावात 66 धावा देत 3 विकेट्स आणि दुसऱ्या डावात 41 धावा देत 1 विकेट घेतली होती. तसेच उपांत्यपुर्व सामन्यात 57 धावा देत 4 विकेट्स घेतल्या हेत्या आणि नाबाद शतकी खेळी केली होती.
-ते आता क्रिकेट ऑल स्टार लीगसाठी काम करतात. तसेच एफसी पुणे सिटीसाठीही काम करतात
– नायक यांचा मुलगा संकेत याने मुंबईकडून वयोगटातील क्रिकेट खेळले आहे.