संपुर्ण नाव- विक्रम राज वीर सिंग
जन्मतारिख- 17 सप्टेंबर, 1984
जन्मस्थळ- चंदिगड, पंजाब
मुख्य संघ- भारत, 19 वर्षांखालील भारतीय संघ, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, किंग्स इलेव्हन पंजाब, पंजाब आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशन अध्यक्षयी एकादश
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज (वेगवान)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 2 ते 6 जून, 2006
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लड, तारिख – 12 एप्रिल, 2006
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 5, धावा- 47, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 5, विकेट्स- 8, सर्वोत्तम कामगिरी- 3/48
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 2, धावा- 8, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-विक्रम राज वीर सिंग याला व्हीआरव्ही सिंग म्हणून ओळखले जाते. जेव्हा त्याने भारतीय संघात पदार्पण केले तेव्हा त्याला संघातील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जात होते.
– विक्रमला त्याच्या सतत होणाऱ्या दुखापतींमुळे जास्त क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. एप्रिल 2006मधील वनडेत पदार्पण सामन्यात आणि पुढील इंग्लंडविरुद्धच्या वनडेत, दोन्हीवेळेला त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने वनडेत 2 सामन्यात केवळ 1 धाव करत निवृत्ती घेतली.
-2006साली मात्र त्याने अबु दाबी येथील भारत अ संघाकडून त्याचे वेगवान गोलंदाजी कौशल्य दाखवून दिले होते. त्याच्या या कामगिरीने त्याला जून 2006मध्ये कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली.
-तो 2006मधील दक्षिण आफ्रिकेच्या यशस्वी कसोटी दौऱ्यातही भारतीय संघाचा भाग होता.
-तो आयपीएलच्या किंग्स इलेव्हन संघाचाही भाग होता.
-विक्रमला त्याच्या दुखापतींमुळे 2008-2012 या काळात देशांतर्गत क्रिकेटपासून दूर रहावे लागले. 2013-14मध्ये प्रथम श्रेणीत पुनरागमन करत त्याने हरियाणाविरुद्ध एका डावात 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.
-त्याने मार्च 2019मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
-बीसीसीआयने 2019मध्ये चंदीगडमध्ये युनियन टेरिटरी क्रिकेट असोसिएशनची स्थापना केली. विक्रम तेथे संघ प्रशिक्षकाचे काम करतो.