संपुर्ण नाव- विरेंद्र क्रिश्नन सेहवाग
जन्मतारिख- 20 ऑक्टोबर, 1978
जन्मस्थळ- नजाफघर, दिल्ली
मुख्य संघ- भारत, आशिया एकादश, दिल्ली, दिल्ली देअरदेविल्स, आयसीसी विश्व एकादश, इंडिया ब्ल्यू, किंग्स इलेव्हन पंजाब, लिसेस्टरशायर, मेरिलिबॉन क्रिकेट क्लब आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशन अध्यक्षयी एकादश
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 3 ते 6 नोव्हेंबर, 2001
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 1 एप्रिल, 1999
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 1 डिसेंबर, 2006
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 104, धावा- 8586, शतके- 23
गोलंदाजी- सामने- 104, विकेट्स- 40, सर्वोत्तम कामगिरी- 5/104
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 251, धावा- 8273, शतके- 15
गोलंदाजी- सामने- 251, विकेट्स- 96, सर्वोत्तम कामगिरी- 4/6
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 19, धावा- 394, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-वडील क्रिश्नन (धान्यांचे व्यापारी) आणि आई क्रिश्ना सेहवाग या दांपत्याच्या 4 मुलांपैकी विरेंद्र सेहवाग हा तिसरा आहे. त्याला मंजू आणि अंजू अशा 2 मोठ्या बहिणी आणि विनोद हा लहान भाऊ आहे.
-त्याला वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी त्याच्या वडिलांनी बॅट विकत घेऊन दिली होती. मात्र, तो 12 वर्षाचा असताना क्रिकेट खेळताना त्याचा दात तुटल्याने त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता. पण आईच्या सांगण्यामुळे पुढे त्याला संधी मिळाली.
-सेहवागने आपले महाविद्यालयीन शिक्षण जामिया मिलिया इस्लामिया येथे घेतले होते.
-एप्रिल 2004मध्ये सेहवागचे आरती अहलावत हिच्याशी लग्न झाले. तत्कालीन केंद्रीय कायदा मंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या निवासस्थानी सेहवागच्या लग्नाचे आयोजन केले होते. लग्नानंतर ते नवी दिल्ली येथे स्थित झाले.
-सेहवागला (2007 साली) आर्यवीर आणि (2010 साली) वेदान्त अशी 2 मुले आहेत.
-सेहवागला विरू, नजाफघरचा नवाब, नजाफघरचा राजकुमार, लिटल तेंडूलकर अशी टोपणनावे आहेत.
-त्याला त्याच्या आईच्या हातची खीर अजूनही खूप आवडते. तो जरी आता श्रीमंत असला तरी त्याचे हे आवडते पक्वान आहे.
-1999-2000साली सेहवागने दुलिप ट्रॉफीतील सर्वोत्कृष्ट 274 धावा करत दुलिप ट्रॉफी फलंदाजांच्या यादीत चौथे स्थान मिळवले होते. हा सामना आगरतला येथे दक्षिण विभागाविरुद्ध झाला होता.
-2000-01च्या हंगामात 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये सेहवाग त्याच्या द्विशतकांसह सातव्या क्रमांकाचा फलंदाज होता. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याची राष्ट्रीय संघात निवड झाली होती.
-1999साली पाकिस्तानविरुद्दच्या सामन्यातून वनडेत पदार्पण करणारा सेहवाग त्या सामन्यानंतर 20 महिने भारतीय वनडे संघापासून दूर होता.
-नोव्हेंबर 2001 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळताना सेहवागवने शतकी खेळी केली होती. 6व्या क्रमांकावर फलंदाजी करत त्याने हा कारनामा केला होता.
-सेहवागच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातच त्याच्यावरती बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी पोर्ट एलिझाबेथ कसोटी सामन्यात मॅच रेफरी माईक डेनेसने सहा भारतीय खेळाडूंना दंड ठोठावला होता. यात सेहवागचाही समावेश होता. त्याला एक वर्षांसाठीची कसोटी बंदी घालण्यात आली होती.
-2003 सालच्या मेलबर्न येथील विश्वचषकातील अंतिम सामन्यात सेहवागने 299 धावांची मोठी खेळी केली होती. यावेळी अवघ्या एका धावेने त्याचे त्रिशतक हुकले होते.
-2004 सालच्या मुलतान येथील ऐतिहासिक पाकिस्तान कसोटी दौऱ्यावर सेहवागने त्रिशतक ठोकले होते. त्यामुळे तो कसोटीत त्रिशतक ठोकणारा पहिला आणि एकमेव फलंदाज ठरला.
-शिवाय हे त्रिशतक 278 चेंडूत केल्याने त्याने सर्वात वेगवान कसोटी त्रिशतक करण्याचाही विक्रम आपल्या नावावर केला होता. तेव्हापासून त्याला ‘नजाफघरचा नवाब’ आणि ‘मुलतानचा सुलतान’ अशी टोपणनावे देण्यात आली.
-एवढेच नाही तर, सेहवाग आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार होता. त्याने खेळलेल्या 19 टी20 सामन्यांपैकी 17 सामन्यात तो भारतीय टी20 संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखालील 10 टी20 सामने भारताने जिंकले आहेत.
-सेहवागला त्याच्या क्रिकेटमधील योगदानामुळे 2002 साली अर्जुन पुरस्कार तर 2010 साली पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
-शिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सेहवागच्या नावावर अनेक विक्रम आहेत.
- कसोटी इतिहासात 2 त्रिशतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सेहवाग चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापुर्वी सर डॉन ब्रॅडमन, ब्रायन लारा आणि ख्रिस गेल यांचा यात समावेश आहे.
- सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर 3 कसोटी सामन्यात 290पेक्षा जास्त धावा करणारा सेहवाग एकमेव फलंदाज आहे.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात वनडे आणि कसोटी दोन्हीतही सलामीला 7500पेक्षा जास्त धावा करणारा तो एकमेव सलामीवीर फलंदाज आहे.
- सेहवाग हा कसोटीत सर्वात वेगवान 7000 धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज आहे.
- सेहवागला कसोटी आणि वनडेत मिळून एकूण 31 सलामीवीर पुरस्कार मिळाले आहेत. एवढे सलामीवीर पुरस्कार मिळवणारा तो सचिन तेंडूलकर (76) आणि सौरव गांगुली (37) नंतरचा तिसरा भारतीय फलंदाज आहे.
- कसोटीत दुसरे आणि तिसरे सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम सेहवागच्या नावावर आहे. तसेच, कसोटीतील सर्वोत्कृष्ट 10 वेगवान द्विशकांपैकी 5 द्विशतके सेहवागने केली आहेत
- वनडेतील दुसरे सर्वात वेगवान द्विशतकही सेहवागने केले आहे. हे द्विशतक त्याने 140 चेंडूत केले होते. त्याच्यापुर्वी 138 चेंडूत वनडेतील सर्वात वेगवान द्विशतक करत ख्रिस गेलने विश्वविक्रम केला होता.