संपुर्ण नाव- वांगीपुरप्पु वेंकट साई लक्ष्मण
जन्मतारिख- 1 नोव्हेंबर, 1974
जन्मस्थळ- हैद्राबाद, आंध्र प्रदेश
मुख्य संघ- भारत, डेक्कन चार्जर्स, हैद्राबाद, कोची टस्कर्स केरळ आणि लँकशायर
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 20 ते 23 नोव्हेंबर, 1996
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 9 एप्रिल, 1998
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 134, धावा- 8781, शतके- 17
गोलंदाजी- सामने- 134, विकेट्स- 2, सर्वोत्तम कामगिरी- 1/2
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 86, धावा- 2338, शतके- 6
थोडक्यात माहिती-
-व्हीव्हीएस लक्ष्मण याचा जन्म डॉक्टर कुटुंबात झाला. त्याचे वडील शांताराम आणि आई सत्यभामा दोघेही डॉक्टर आहेत. तसेच भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे लक्ष्मणचे पंजोबा होते.
-लक्ष्मणचे मामा बाब कृष्णमोहम हे हैद्राबादमध्ये क्लब क्रिकेटर होते. त्यांनीच लक्ष्मणला सात वर्षांचा असताना सेंट जॉन कोचिंग क्लबमध्ये दाखले केले होते.
-लक्ष्मणने 16 फेब्रुवारी 2004ला जी आर शैलजा हिच्याशी लग्न केले. ती कम्प्युटर सायन्स पदव्युत्तर आहे. या जोडप्याला सर्वजीत हा मुलगा आणि अचिंता ही मुलगी आहे.
-लक्ष्मण हा जरी हैद्राबादचा असला तरी तो शुद्ध शाकाहारी आहे. त्यातही त्याल रासम जे पूर्णपणे दाक्षिणात्त्य पद्धतीने बनवले जाते, ते खूप आवडते.
-लक्ष्मण हा साई बाबा यांचा मोठा भक्त आहे. त्याने त्याच्या काकांनी साई बांबावर बनवलेली सीडीही लँच केली.
-2003-04 च्या ऑस्ट्रेलिया कसोटी दौऱ्यातील लक्ष्मणची कामगिरी पाहुन इयान चॅपेल यांनी त्याला ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ असे टोपननाव दिले होते.
-लक्ष्मण हा क्रिकेटसह अभ्यासातही हुशार होता. 10वी बोर्डात त्याला 98 टक्के गुण मिळाले होते. त्याच्या या ट्क्केवारीमुळे पालकांनी त्याला मेडिकल करण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. पण लक्ष्मणला क्रिकेटमध्ये जास्त रस असल्याने त्यांनी त्याला पाठिंबा दिला.
-फेब्रुवारी 1987मध्ये लक्ष्मणने त्याच्या क्रिकेट कारकार्दीतील पहिले शतक वयोगट सामन्यात खेळताना केले होते. आंध्र प्रदेशविरुद्ध हैद्राबादकडून विजयवाडा येथे 13 वर्षांखालील सामन्यात खेळताना लक्ष्मणने 153 धावा केल्या होत्या.
-त्याने त्याच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध अत्यंत चांगली कामगिरी केली होती. लक्ष्मणने फेब्रुवारी 1994मध्ये 19 वर्षांखालील ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध 19 वर्षांखालील भारतीय संघात पदार्पण केले होते. यावेळी 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करत त्याने 88 धावा केल्या होत्या.
तर, पुढील सामन्यातील पहिल्या डावात 151 आणि दुसऱ्या डावात 77 धावा करत त्याने विजयासाठी 226 धावांचे योगदान दिले होते.
-19 वर्षांखालील मालिकेत त्याने 110.25च्या सरासरीने सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम केला होता.
-1992-93च्या रणजी ट्रॉफी हंगामातील उपांत्यपुर्व फेरितून लक्ष्मणने प्रथम श्रेणीत पदार्पण केले होते. यावेळी हैद्राबादकडून पंजाबविरुद्ध पहिला डाव शून्यावर आणि दुसरा डाव 17 धावांवर संपवला होता.
-लक्ष्मणचे डकशी (शून्यावर बाद होणे) वेगळेच नाते होते. त्याने केवळ प्रथम श्रेणीची सुरुवात शून्याने नव्हे, तर वनडेची सुरुवात आणि शेवटही शून्याने केला होता.
-अहमदाबाद येथील 1996च्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी पदार्पणात लक्ष्मणने चमकदार कामगिरी केली होती. यावेळी पहिल्या डावात 11 आणि दुसऱ्या डावात कठीण खेळपट्टीवर 51 धावा करत, त्याने भारताला 64 धावांनी सामना जिंकण्यास मदत केली होती.
-1999-2000च्या रणजी ट्रॉफी हंगामात त्याने 1415 धावा केल्या होत्या. हा एका हंगामात सर्वाधिक करण्याचा विक्रम ठरला.
-कसोटीत आपल्या अनिश्चित स्थानामुळे लक्ष्मणला त्याचे पहिले कसोटी शतक करण्यासाठी 17 सामन्यांची वाट पहावी लागली. त्याने 2000साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 167 धावा करत त्याचे पहिले कसोटी शतक केले होते.
-2001मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत लक्ष्मणच्या कारकिर्दीला नवे वळण मिळाले. त्याने यावेळी पहिल्या पहिल्या डावात 6व्या क्रमांकावर 59 धावा केल्याने कर्णधार गांगुलीने त्याला पुढील डावात 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी दिली. यावेळी संधीचे सोने साधत त्याने 281 धावा केल्या आणि भारताला विजयी बनवले.
-त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्द 29 कसोटी सामने खेळत 49.67च्या सरासरीने 2434 धावा केल्या. तर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 21 वनडे सामने खेळत त्याने 46.18च्या सरासरीने 739 धावा केल्या होत्या.
-शिवाय लक्ष्मणच्या कारकिर्दीतील 17 कसोटी शतकांपैकी 6 शतके आणि 6 वनडे शतकांपैकी 4 शतके ही त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना केली आहेत. तर, त्याच्या कारकिर्दीतील 2 द्विशतके ही त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच केली आहेत.
-लक्ष्मणने राहूल द्रविडसोबत मिळून कसोटीत सर्वाधिक धावांची (376) भागीदारी करण्याचा विश्वविक्रम नोंदवला होता. तसेच, कसोटी सामन्याच्या एकाच सत्रात 6व्या क्रमांकावर असताना 100 धावा करण्याचाही विक्रम केला आहे.
-त्याने एका वनडे मालिकेत 12 झेल झेलण्याचाही विक्रम केला आहे. हा वि्रम त्याने 2003-03मध्ये व्हीबी सीरीजमध्ये केला होता.
-हैद्राबादच्या समंता रूथ प्रभू आणि पुलेला गोपिचंद यांच्यासह मिळून फूड फॉर चेंज हा चॅरिटी इवेंट आयोजित केला होता. ज्यात त्यांनी 2 लाख विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाचे कार्य केले.
-लक्ष्मण हा 100पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणाऱ्या तुरळक क्रिकेटपटूंपैकी एक आहे. पण त्याला एकही विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली नाही.
-2012च्या ऑस्ट्रेलिया कसोटी दौऱ्यातील पराभवानंतर लक्ष्मणने कसोटीतून निवृत्ती घेतली.
-2004 साली ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिका खेळताना लक्ष्मणने एका आठवड्यात 3 शतके करण्याचा विक्रम नोंदवला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने नाबाद 103 धावा केल्या. पुढे 4 दिवसांनंतर 106 धावा आणि 2 दिवसांनी झिम्बाब्वेविरुद्ध 131 धावा असी त्यांची शतकी खेळी होती.
-त्याने लँकशायरकडून कांउटी क्रिकेट खेळले आहे. तर आयपीलच्या डेक्कन चार्जर्सचाही तो भग होता.
-क्रिकेटमधील निवृत्तीनंतर लक्ष्मण समालोचक बनला. तो सनराइजर्स हैद्राबादचा मार्गदर्शक होता. तसेच बंगाल रणजी ट्रॉफी संघाचा तो फलंदाजी सल्लागार होता. तसेच बीसीसीआयच्या सल्लागार समितीचा सदस्य आणि क्रिकेट कांउट्री या वेबसाइटचा तो मुख्य मार्गदर्शकही आहे.