संपुर्ण नाव- वुरकेरी वेंकट रमण
जन्मतारिख- 23 मे, 1965
जन्मस्थळ- मद्रास (आताची चेन्नई)
मुख्य संघ- भारत आणि तमिळनाडू
फलंदाजीची शैली- डाव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- डाव्या हाताचा गोलंदाज (फिरकीपटू)
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख -11 ते 15 जानेवारी, 1988
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 2 जानेवारी, 1988
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 11, धावा- 448, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 11, विकेट्स- 2, सर्वोत्तम कामगिरी- 1/07
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 27, धावा- 617, शतके- 1
गोलंदाजी- सामने- 27, विकेट्स- 2, सर्वोत्तम कामगिरी- 1/23
थोडक्यात माहिती-
-वुरकेरी रमण यांनी तमिळनाडू संघासाठी मोलाचे योगदान दिले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी तमिळनाडूकडून अधिकतर 8व्या किंवा 9व्या क्रमांकावरती फलंदाजी केली होती. त्यामुळे त्यांना प्रथम श्रेणीतील पहिले अर्धशतक मारण्यासाठी 4 हंगाम आणि 16 डावांचा कालावधी लागला.
-मात्र, पुढे त्यांनी 1987 सालच्या प्रथम श्रेणी हंगामात केवळ 5 सामन्यात 3 अर्धशतके नाोंदवली.
-वनडेतही सुरुवातीला त्यांना खालच्या फळीतच फलंदाजी करायला मिळाली. पण, 1988 सालच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यानंतर त्यांना पुढील सामन्यात रवि शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. मात्र यावेळी त्यांची शतक करण्याची संधी केवळ 5 धावांनी हुकली. त्यांनी 95 धावा केल्या.
-दिलीप वेंगसरकर यांना दुखापत झाल्याने रमण यांना 1988 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली यावेळीही शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली रमण यांनी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत 83 धावा केल्या होत्या. शिवाय पहिल्या षटकात 1 विकेटही घेतली होती.
– पुढे 1988-89च्या हंगामात तमिळनाडूकडून खेळताना रमण यांनी 313, नाबाद 200 आणि 238 धावांच्या मोठ्या खेळा केल्या होत्या. यासह त्यांनी संपूर्ण हंगामात 1018 धावा पूर्ण करत रुसी मोदी यांचा जुना विक्रम मोडला होता.
– निवृत्तीनंतर रमण यांनी प्रशिक्षण करण्याचे ठरवले. 2006 साली त्यांची तमिळनाडू संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली होती. त्यांनी बराच काळ तमिळनाडूचे प्रशिक्षण केले.
-त्यानंतर 2010 साली त्यांची रॉजर बिन्नी यांच्या जागी बंगालच्या प्रशिक्षकपदी निवड झाली. पुढे त्यांनी आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाचेही प्रशिक्षण केले होते.
-2015 साली रमण यांची बंगलुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली.
-त्यांनी भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाचीही जबाबदारी सांभाळली आहे. डिसेंबर 2018मध्ये त्यांची या पदी निवड झाली होती.
– त्यांनी 19 वर्षांखालील भारतीय संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे.
-रमण यांनी जानेवारी 2020 मध्ये त्यांच्या द विनिंग सिक्सर या पुस्तकाचे प्रकाशन केले.