---Advertisement---

मराठीत माहिती- क्रिकेटर यशपाल शर्मा

Yashpal-Sharma
---Advertisement---

संपुर्ण नाव- यशपाल शर्मा

जन्मतारिख- 11 ऑगस्ट, 1954

जन्मस्थळ- लुधियाणा, पंजाब

मुख्य संघ- भारत, हरियाणा, पंजाब आणि रेल्वे

फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज

गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज

क्षेत्ररक्षणाची जागा – यष्टीरक्षक

आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण-  भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 2 ते 7 ऑगस्ट, 1979

आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध पाकिस्तान, तारिख – 13 ऑक्टोबर, 1978

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द- 

फलंदाजी- सामने- 37, धावा- 1606, शतके- 2, अर्धशतके – 9

गोलंदाजी- सामने- 37, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/6

आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-

फलंदाजी- सामने- 42, धावा-883, शतके- 0, अर्धशतके – 4

गोलंदाजी- सामने- 42, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/27

थोडक्यात माहिती-

-1977-78मध्ये उत्तर विभागाकडून खेळताना यशपाल शर्मा यांनी दक्षिण विभागाविरुद्ध दुलिप ट्रॉफीत 173 धावांची मोठी खेळी होती. ज्यामुळे त्यांची राष्ट्रीय संघातील निवडीची दारे खुली झाली होती.

-त्यानंतर त्यांची 1978 साली पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यात निवड झाली होती. तर, 1979 साली कसोटीत निवड झाली होती.

-1979 ते 1983 यादरम्यानच्या कसोटी कारकिर्दीत यशपाल यांनी मधल्या फळीतील फलंदाज म्हणून कामगिरी केली.

-त्यांनी 1979च्या इंगल्ंड दौऱ्यात कसोटीत चांगले प्रदर्शन केले होते. यावेळी त्यांनी 58.93 च्या सरासरीने 884 धावा केल्या होत्या.

-नवी दिल्ली येथील 1979-80च्या कसोटी सामन्यात यशपाल यांनी ऑस्टेलियाविरुद्ध महत्त्वाचे शतक ठोकले होते. तर, पुढील वर्षात म्हणजेच 1981-82 साली मद्रास (आत्ताचे चेन्नई) येथे इंग्लंडविरुद्दच्या कसोटीत त्यांनी गुंडप्पा विश्वनाथ यांच्यासोबत मिळून 316 धावांची मोठी भागिदारी रचली होती. यातील 140 धावा यशपाल यांनी केल्या होत्या.

-इंग्लंड दौऱ्यानंतर 1982-83मध्ये पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतही यशपाल भारतीय संघाचा भाग होते.

– तसेच यशपाल 1983च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होते.

-मात्र, 1983-84ला पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात त्यांचा फलंदाजी फॉर्म घसरला. ज्यामुळे त्यांना पुढे संघात सामील करण्यात आले नाही आणि नंतर त्यांनी कसोटीतून निवृत्ती घेतली. मात्र, तरीही पुढे काही काळ ते वनडेमध्ये खेळले.

-निवृत्तीनंतर यशपाल यांनी डिसेंबर 2005पर्यंत राष्ट्रीय निवडकर्ता म्हणूनही काम केले आहे. त्यानंतर पुन्हा 2008मध्ये त्यांची निवड समीतीत पुन्हा नियुक्ती झाली होती.

-42 वनडे सामने खेळताना त्यांनी 42 सामन्यांमध्ये फलंदाजी केली त्यातील एकाही सामन्यात ते शून्यावर बाद झाले नाही, तर 2 सामन्यांत त्याच्यावर फलंदाजीची वेळच आली नाही.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---